Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दोघांना अटक, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | नवीन वर्ष (New Year) असल्याने पोलिसांकडून दारू अड्ड्यावर आणि वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर व परिसरात अनेक पर्यटक येत असल्याने विनापरवाना दारु (Liquor) विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) विनापरवाना बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांची माहिती कढून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.29) ब्राह्मणोली गावात केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे (Lonavla Rural Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती मिळाली की, ब्राह्मणोली गावच्या हद्दीतील विरोबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडच्या मागे दोन जण ओळखीच्या लोकांना देशी विदेशी दारुची बेकायदेशीर विक्री करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने याठिकाणी छापा टाकून युवराज दत्तात्रय पासलकर (रा. विकास नगर, देहूरोड मुळ रा. वरसगाव ता. वेल्हे) व शुभम वासुदेव कोंदडवार (रा. ब्राह्मणोली मुळ रा. देवाडा ता. राजुरा, जि. चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलीस पथकाने आरोपींच्या ताब्यातून बर्ड वाइजर मॅग्नम बिअर (Budweiser Magnum Beer), बर्ड वाइजर प्रीमियम बिअर (Bird Wiser Premium Beer) असा एकूण 7 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Prohibition Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

ही कारवाी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल (IPS Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे (Addl SP Mitesh Gatte), सहायक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक (ASP Satyasai Karthik) यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ (Sr PI Kishore Dhumal) यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे (PSI Sagar Argade), पोलीस अंमलदार विजय गाले, जय पवार, प्रकाश कडाळे, नितीन कदम, नागेश कमठणकर यांच्या पथकाने केली.