Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण सोडवणाऱ्या दोघांना बेदम मारहाण, 8 जणांना अटक; पर्वती परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | टोळक्याकडून मित्राच्या भावाला माराहण सुरु असताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जनता वसाहत येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत रोहित सुभाष गोरखे (वय-23 रा. ग.नं. 77 वरचा टप्पा, जनता वसाहत, पर्वती, पुणे) याने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम उर्फ बॉम्ब कैलास कांबळे (वय-26), अल्ताब उर्फ चांद फारुख सय्यद (वय-24), रत्नदिप उर्फ बाळा संपत रणखांबे (वय-23), ओंकार प्रमोद परदेशी (वय-20), मयुर गणेश काळे (वय-26), झेंड्या उर्फ संदीप शिवनारायणसिंग ठाकुर (वय-19), बल्लोर उर्फ राहुल शिवनारायण सिंग ठाकूर (वय-22), सुमित बाळकृष्ण सोनावणे (वय-24 सर्व रा. जनता वसाहत, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित व त्याचा मित्र पवन कोळी हे वरचा टप्पा येथे चालत जात होते.
त्यावेळी त्यांच्या मित्राचा भाऊ शंकर काकडे याला आरोपी मारहाण करत होते.
त्यामुळे रोहित व पवन हे शंकर याच्या मदतीसाठी गेले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व पवन यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी सुमित सोनावणे याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी स्टम्प मारुन जखमी केले.

तर पवनच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सोनावणे याच्या इतर साथीदारांनी रोहित व पवन यांना बांबू व दगडाने मारहाण केली.
यावेळी वस्तीतील लोक त्याठिकाणी आले. आरोपींनी लोकांना धमकावून परिसरात दहशत पसरवली.
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घावटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भररस्त्यात अडवून तरुणीला मारहाण करुन विनयभंग, खराडी परिसरातील प्रकार

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात जल्लोषात श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा (Videos)

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पिंपरी : गांजा विक्री करणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त