Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंपनीतील कामगाराने तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोकड पळवली

तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने ऑफिसमधील लोखंडी तिजोरीसह 14 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 30 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत सोमाटणे टोलनाक्या जवळ असलेल्या जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा. लि. कंपनीत घडला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत रोहन समिर मोरे (वय-43 रा. तळेगाव दाभाडे, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.16) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अकिल गुलाब शेख (वय-24 मुळ रा. परभणी सध्या रा. सोमाटणे, ता. मावळ) याच्यावर आयपीसी 381 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक केलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्या जवळ जापलूप इक्वेस्ट्रियन सेंटर प्रा. लि. कंपनी आहे. फिर्यादी यांनी कंपनीच्या कार्यालयात असलेल्या लाकडी कपाटात लहान लोखंडी तिजोरी ठेवली आहे. फिर्यादी यांनी कंपनीत जमा झालेली 14 लाख 50 हजार रुपये लोखंडी तिजोरीत ठेवले होते. आरोपी अकिल शेख याने लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील तिजोरी व त्यातील रोख रक्कम असा एकूण 14 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पाच मिनिटात लाईटचे काम करुन दे, काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांचे थेट उत्तर; ”हा लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो”

भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण, चंदननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

दरोड्याच्या तयारीतील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, कोयते जप्त

Pune Police News | पुणे : महिला पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक