Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तडीपार गुन्हेगाराला शस्त्रसह गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.6) रात्री साडे दहाच्या सुमारास निगडी येथील परशुराम चौकात (Nigdi Chowk) करण्यात आली. (Tadipar Criminal Arrest)

निहाल महमद शेख (वय-25 रा. दत्तमंदिराच्या मागे, मोहननगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत युनिट दोनचे पोलीस नाईक आतिष शामराव कुडके यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी आरोपीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे पोलीस आयुक्तालय
आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी नोव्हेंबर 2023 मध्ये तडीपार केले आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन आरोपी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये फिरत होता. याबाबत युनिट दोनच्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला परशुराम चौकातून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक धारदार लोखंडी कोयता मिळाला. पोलिसांनी कोयता जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित