Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : उसने घेतलेले पैसे परत देण्यास मित्राने नकार दिल्याने आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | मित्राला त्याच्या व्यावसायासाठी इतरांकडून उसने व व्याजाने पैसे घेऊन दिले. मात्र, मित्राने उसने घेतलेले पैसे लोकांना परत देण्यास नकार देऊन मानसिक व आर्थिक त्रास दिला. या त्रासाला वैतागून एका व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). ही घटना शुक्रवारी (दि.5) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्रिशक्ती कॉलनी तापकीरनगर, काळेवाडी (Tapkir Nagar Kalewadi) येथे घडली.

दौलतराम भानुदास वाघ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संदीप भिकचंद बागमार (वय-45 रा. दगडु पाटील नगर, थेरगाव) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दौलतराम यांची पत्नी ललीता दौलतराम वाघ (वय-50 रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दौलतराम आणि आरोपी संदिप यांच्यात मागील सहा ते सात वर्षापासून मैत्री होती. फिर्यादी यांच्या पतीने संदिप याला त्याच्या व्यवसाया करीता अनेक लोकांकडून उसने व व्याजाने पैसे घेऊन दिले होते. मात्र, त्याने दिलेले पैसे लोकांना परत दिले नाहीत. त्यामुळे लोकांनी फिर्यादी यांच्या पतीकडे पैशासाठी तगादा लावला होता. पैशाच्या कारणामुळे फिर्यादी आणि पती मध्ये वाद होत होते.

तसेच आरोपी संदिप याने पैसे परत करण्यास नकार देवून दौलतराम यांच्यासोबत भांडण केले.
आरोपीने मानसिक व आर्थिक त्रास दिल्याने फिर्यादी यांचे पती तणावात होते.
याच तणावातून दौलतराम वाघ यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
फिर्यादी यांच्या तक्रीरीवरुन पोलिसांनी संदिप बागमार याच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित