Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : व्यावसायिकाच्या गाडीची कोयत्याने तोडफोड, दहशत पसरवणाऱ्या स्वयंघोषीत भाईला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? अशी धमकी देऊन व्यावसायिकाच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सांयकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बोपखेल (Bopkhel) येथे घडली.

याबाबत अभिजित ओमप्रकाश अगरवाल (वय-35 रा. शितळादेवी मंदीर जवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोन्या तांबे, आकाश अर्जुन गिरीगोसावी (वय-30 रा. पाटील वाडा, बोपखेल), विक्री पिल्ले, शुभम अहिरवार, अजय पिल्ले याच्यासह इतर पाच ते सहा जणांवर आयपीसी 395, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आकाश गिरीगोसावी याला अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्याच्या घराजवळ अल्टो कार पार्क केली होती.
ते गाडीजवळ आले असता आरोपी हातात कोयते घेऊन त्यांच्या जवळ आले.
त्यांनी फिर्य़ादी यांना कोयत्याचा धाक दाखवून मी इथला भाई आहे, तुला माहिती नाही का? अशी धमकी दिली.
तसेच आरोपींनी फिर्य़ादी यांच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने 560 रुपये काढून घेतले. यानंतर फिर्यादी यांच्या कारच्या पुढील आणि डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर कोयता मारुन दहा हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच हातातील काठ्या, कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”