Pune Pimpri Chinchwad Crime | सराईत वाहन चोराला भोसरी पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भोसरी पोलीस स्टेशनच्या (Bhosari Police Station) तपास पथकने सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख 84 हजार रुपये किंमतीच्या 16 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (वय 24 रा. वळसाने, ता. साकी जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In Vehicle Theft)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी तपास पथकाच्या दोन वेगवेगळ्या टीम तयार केल्या. भोसरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलींग तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करून रेकॉर्डवरील आरोपी योगेश दाभाडे याला ताब्यात घेतले.(Pune Pimpri Chinchwad Crime)

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने व त्याचा साथीदार मॉन्टी वाघ (वय-22 रा. दहिवद ता. चाळीसगाव जि. जळगाव) या दोघांनी भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी या परीसरातुन चोरी केलेल्या 16 मोटारसायकल काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त कल्या आहेत.

आरोपी योगेश शिवाजी दाभाडे हा अट्टल मोटार सायकल चोरटा असुन त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण येथे यापुर्वी मोटार सायकली चोरीचे एकुण 17 गुन्हे केले आहेत. आरोपी कडुन गुन्ह्यातील चोरी केलेल्या एकुण 3 लाख 84 हजार रुपये किंमतीच्या 16 मोटार सायकल जप्त करुन 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपींनी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7, म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील 1, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 1, खडकी पोलीस ठाण्याच्या
हद्दीतील 1, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 असे एकूण 14 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1
स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण,
पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले,
पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोरे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, महिला पोलीस नाईक मुळे,
स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Inspector Suicide | पुणे सीआयडीमधील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या, रेल्वे रुळावर संपवलं जीवन

Pune News | बंगळुरुतील कॅफे बॉम्बस्फोटातील दहशतवादी पुण्यात असल्याचा NIA ला संशय, पथकाकडून तपास सुरु

Khadakwasla Crime | तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या हवेली पोलिसांनी आवळल्या मुसक्या (Video)