Pune Pimpri Chinchwad Police | 34 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा: पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्तालयाने पटकवली 23 सुवर्ण पदकांसह पटकावली 56 पदके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police | नाशिक येथे नुकतीच 34 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड व पुणे पोलीस आयुक्तलयाच्या संघाने 23 सुवर्ण, 13 रजत, 20 कांस्य अशी एकूण 56 पदकांची कमाई केली आहे. विजेत्या खेळाडूंचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी अभिनंदन करून बक्षीस दिले आहे. (Maharashtra Police)

महिला पोलीस शिपाई यामिनी उमेशराव ठाकरे या महिला खेळाडूने स्पर्धेची उत्कृष्ट महिला खेळाडू हा सन्मान देण्यात आला. या स्पर्धेमध्ये यामिनी ठाकरे या खेळाडूने 5000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात 16 मिनिटे 29 सेकंद वेळ नोंदवून स्पर्धेत वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले.(Pune Pimpri Chinchwad Police)

महिला पोलीस शिपाई प्रियंका ज्ञानदेव फलके या खेळाडूने गोळा फेक या क्रीडा प्रकारात 14.45 मीटर गोळा फेकून
स्पर्धा मध्ये वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले. 34 वर्षानंतर महिला कबड्डी क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक
पटकाविले आहे. पुरुष हँडबॉल संघाने द्वितीय स्थान, महिला खो-खो संघाने तृतीय स्थान, बॉक्सिंग क्रीडा प्रकारात
महिला संघाने चॅम्पियनशिप तसेच पुरुष गटाचे तृतीय बक्षीस मिळाले.

महिला संघाने जनरल चॅम्पियनशिप मध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. महिला अथलेटिक संघ अॅथलेटिक्स रँकिंग
मध्ये दुसरे स्थान मिळाले. तर तायक्वांदो क्रीडा प्रकारात उत्कृष्ट खेळाडू म्हणून पोलीस अंमलदार मयूर कैलास शिंदे
यांना सन्मान देण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Water Supply | बुधवारी बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा बु. परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार

Workshop On Atrocities Act In Pune | ॲट्रॉसिटी कायद्याविषयी एक दिवशीय कार्यशाळेचे रविवारी आयोजन; निवृत्त न्यायाधीश सी एच थुल करणार उद्घाटन