Pune Pimpri Chindhwad Crime | पिंपरी : रंग लावण्यावरून वाद, घरात घुसून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chindhwad Crime | धुलीवंदनाच्या (Dhulivandan) दिवशी रंग लागवण्याच्या कारणावरुन वाद होऊन चार जणांनी एका तरुणाला घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.25) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सेनेटरी चाळ, पिंपरी (Sanitary Chal Pimpri) येथे घडली आहे.(Pune Pimpri Chindhwad Crime)

याबाबत प्रेम सचिन मोरे (वय-18 रा. सेनेटरी चाळ पत्रा शेड, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नॉडी गायकवाड (रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी), कार्तिक शेट्टी (रा. मिलिंद नगर), ओम सावंत, अजित निकम (रा. पिंपरी) यांच्यावर आयपीसी 452, 324, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुलिवंदनाच्या दिवशी फिर्यादी प्रेम त्यांच्या घराच्या खाली थांबले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी रंग लावण्यासाठी आले. तेव्हा माझ्या घरी पाहुणे आले आहेत, त्यामुळे आपण रंग नंतर खेळु असे सांगितले. मात्र, आरपींनी प्रेम याला रंग लावण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. काही वेळाने प्रेम घरात जेवणाचा कार्यक्रम असल्याने भाजी आणण्यासाठी भाजी मंडईत गेला.

त्यावेळी आरोपी समोरून येताना प्रेम याने पाहिले. त्यामुळे तो पळुन घरी आला व घराचा दरवाजा बंद केला.
आरोपी प्रेमच्या पाठिमागुन आले. त्यांनी घराचा दरवाजावर लाथा मारुन प्रेमला अश्लील शिवीगाळ केली.
त्यानंतर नॉडी, कार्तिक व ओम यांनी जबरदस्तीने घरात घुसून प्रेम याच्यावर कोयत्याने हातावर वार करुन जखमी केले.
तर इतर आरोपींनी प्रेमला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Sadanand Date | मराठी पाऊल पडते पुढे! पुण्याचे सुपुत्र सदानंद दाते NIA च्या महासंचालकपदी

Pune Mahavitaran News | सदाशिव पेठेतील खोदाई लेखी परवानगीसह चलन भरूनच: महावितरणकडून स्पष्टीकरण

Pune Chandan Nagar Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगाराला चंदननगर पोलिसांकडून अटक

Maharashtra Congress On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर काँग्रेस नाराज, ”चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट”