Pune Pimpri Crime | व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या किरण भुमकर, अमर भुमकर यांच्यावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | विकसीत होत असलेल्या प्रकल्पामध्ये ॲल्युमिनियम विंडो (Aluminum Windows) आणि एस एस ग्लास रोलिंगचे (SS Glass Rolling) केलेल्या कामाचे पैसे न देता व्यावसायिकाची (Businessman) आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार हिंजवडी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर हिंजव़डी पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) हिंजवडी येथील मे. मॅग्नोवा रिअल्टी प्रोजेक्टमध्ये 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला.

किरण भुमकर (Kiran Bhumkar), अमर भुमकर Amar Bhumkar (दोघे रा. भुमकर नगर, वाकड ब्रिज जवळ, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत हरिष गुलाब वाघिरे Harish Gulab Vaghire (वय-34 रा. तपोवन मंदिर रोड, पिंपरी वाघेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे.
(Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी हिंजवडी येथे विकसित होत असलेल्या मॅग्नोवा रिअल्टी या
प्रकल्पामध्ये (Magnova Realty Project) ॲल्युमिनियम विंन्डे व एस एस ग्लास रोलिंगचे काम केले आहे.
या कामाचे 50 लाख 33 हजार 908 रुपये झालेल्या बिलापैकी आरोपींनी फिर्यादी यांना 37 लाख 55 हजार 500 रुपये डिसेंबर 2018 मध्ये दिले आहेत.
उर्वरित 12 लाख 78 हजार 108 रुपये फिर्यादी यांनी मागितले.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना प्रत्येकी 6 लाख 39 हजार 054 रुपयांचे कोटक महिंद्रा बँक वाकड शाखेचे
(Kotak Mahindra Bank Wakad Branch) दोन चेक दिले.
फिर्यादी यांनी चेक बँकेत जमा केले मात्र अमर भुमकर यांनी चेकचे स्टॉप पेमेंट (Stop Payment) करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
किरण आणि अमर भुमकर यांनी 12 लाख 78 हजार 108 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मारणे (ASI Marne) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | FIR against Kiran Bhumkar, Amar Bhumkar who defrauded a businessman of lakhs of rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime  | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

Pune Crime | भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या बुकीवर कारवाई; पबवर छापा टाकून गुन्हे शाखेची कारवाई

PI Swati Desai Passed Away | पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन