Pune Pimpri Crime News | ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर चोळून 27 लाखांची रोकड लुटली, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने 5 जणांना केली अटक; 11 लाखांची रोकड जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Pimpri Crime News | मनी ट्रान्सफरची रक्कम घेऊन जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या गाडीला धक्का देऊन चेहऱ्यावर मिरची पावडर लावली. त्यानंतर धक्का बुक्की करुन त्यांच्याजवळील 27 लाख 25 हजार 800 रुपये असलेली पैशांची बॅग चोरून नेली. हा प्रकार 14 नोव्हेबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे घडला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने (Pimpri Chinchwad Crime Branch) पाच जणांना अटक केली असून 11 लाख 35 हजार 400 रुपयांची रोकड जप्त केली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत प्रकाश भिकचंद लोढा (वय-68 रा. एलआयजी कॉलनी, प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्य़ाद दिली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करुन गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी विशाल साहेबराव जगताप (वय-25 रा. चिंचेचा मळा, मोरेवस्ती, चिखली, मुळ रा. मु.पो. संक्रापुर, ता. राहुरी), लालबाबु बाजीलाल जयस्वाल (वय-28 सध्या रा. तुळजाभवानी चौक, चिखली, मुळ रा. तहसिल भाटपाराणी जि. देवारिया, उत्तर प्रदेश), जावेद अकबर काझी (वय-50 रा. किवळे, देहूरोड), अभषेक दयानंद बोडके (वय-19 रा. मोरेवस्ती चिखली), धिरेंद्र सिंग असवाणी (वय-38 रा. संगम हौसिंग सोसायटी, चिखली) यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

निगडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey) यांनी गुन्हे शाखेतील सर्व युनिट व शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore) व सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (ACP Balasaheb Kopner) यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील (Senior PI Santosh Patil) यांना आदेश दिले. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड (Senior PI Shailesh Gaikwad), संतोष पाटील यांनी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार केली.

त्यानुसार, खंडणी विरोधी पथक व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या अधिकारी व अंमलदार यांची वेगळवेगळी पथके तयार करुन गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. त्यावेळी दोन अनोळखी आरोपी निष्पन्न झाले.
त्यापार्श्वभूमीवर तपास करत असताना दरोडा विरोधी पथकाने विशाल जगताप याला पुणे नाशिक महामार्गावरील
कुरुळी फाटा येथून अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेल्या रक्कमेपैकी त्याच्या हिस्स्याला आलेले 8 लाख 1 हजार 500
रुपये जप्त केले.

आरोपी विशाल जगताप याच्याकडे सखोल चौकशी करुन लालाबाबु जयस्वाल, जावेद काझी, अभिषेक बोडके यांना
चिखली परिसरातून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

क्रेडीट कार्डचे पैसे भरले

पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु ठेवला. तांत्रिक विश्लेषणाच्या तपासावरुन संशयित आरोपी धिरेंद्र सिंग हा मनोज जयस्वाल याच्या सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी धिरेंद्र सिंग याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने मनोज जयस्वाल याच्याकडे 13 लाख
रुपये ठेवले होते. त्यापैकी काही रक्कम मनोजच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या खात्यात पाठवली. क्रेडीट कार्डचे पैसे भरले,
सोसायटीचे लोन भरले, इतर आरोपींच्या विमानाचे तिकीट काढले.
तसेच सोन्याचे दागिने व एक मोबाईल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी मालमत्ता हस्तगत केली

आरोपी धिरेंद्र सिंग याने पाठवलेल्या रक्कमेचे वेगवेगळी बँक खाते गोठवण्यात आली आहेत. तसेच इतर मालमत्ता
हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आतापर्य़ंत 11 लाख 35 हजार 400 रुपये रोख व इतर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या कामगाराला लुटण्याचा प्लॅन

अटक करण्यात आलेले आरोपी आणि फरार आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे काम करणारा कामगार मोहन वैद्य
याला लुटण्याचा प्लॅन केला केला होता. त्यानुसार आरोपींनी दोन वेळा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे (Joint CP Dr. Sanjay Shinde),
अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे,
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार (DCP Dr. Shivaji Pawar), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने
(ACP Satish Mane), सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख,
पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, भरत गोसावी, गणेश माने, तसेच दरोडा विरोधी पथक युनिट 1,2,3,4,
खंडणी विरोधी पथक व तांत्रक विश्लेषण विभागातील अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता