Pune Pimpri Crime | पिंपरी : भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरी करणारा गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांनी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वाकड पोलिसांच्या (Wakad Police) पथकाने घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. या कारवाईत 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नखाते वस्ती परिसरात केली. (Pune Pimpri Crime)

याप्रकरणी पोलीस हवालदार विक्रांत चिंतामण चव्हाण (वय-38) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हेमाराम थानारामजी चौधरी (वय-38 रा. मथुरा कॉलनी समोर, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) आयपीसी 285 सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा 1955 चे कलम 3, 7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नखाते वस्ती येथील श्रीराम सायकल मार्ट येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिफीलिंग सर्कीटच्या सहाय्याने गॅस अवैधरित्या दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरताना आढळून आला.

आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत असताना आढळून आले. त्याच्याकडून 18 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावर्डे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पाच मिनिटात लाईटचे काम करुन दे, काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांचे थेट उत्तर; ”हा लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो”

भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण, चंदननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

दरोड्याच्या तयारीतील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, कोयते जप्त

Pune Police News | पुणे : महिला पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून बेकायदा फ्लॅट बळकावले; शरद बारणे आणि बाळासाहेब बारणेंच्या विरूध्द गुन्हा दाखल