Pune PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेची पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमधील सार्वजनिक रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांवर सोमवारी (दि.7) अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 43000 स्क्वे फुटाचे अनधिकृत बांधकाम, 7 ट्रक (स्टॉल, हातगाडी, पथारी, काउंटर) व 93 बोर्ड,बॅनर इत्यादी जप्त करण्यात आले. (Pune PMC Anti-Encroachment Drive)

वानवडी चौक, वैदुवाडी चौक, हडपसर गाव वेस, रवीदर्शन चौक, लक्ष्मी कॉलनी परिसरातील सोलापूर रस्त्यावरील रस्तारुंदीत येणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तसेच रस्ता, पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय कराणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर देखील कारवाई करण्यात आली. याशिवाय अतिक्रमण विभागाने दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रातील अटी व शर्तींचा भंग करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये स्वत: व्यवसाय न करता पोटभाडेकरु ठेवणे, ठरवून दिलेल्या जागावर व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे अशा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. (Pune PMC Anti-Encroachment Drive)

याशिवाय फ्रंट मार्जिन कारवाई, बोर्ड बॅनर कारवाई, सिमेंट ओटे यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी एक क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, 4 अतिक्रमण निरीक्षक, 20 सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, 4 जेसीबी, 4 गॅस कटर, 8 ट्रक व 76 बिगारी कामागार, 16 पोलीस कर्मचारी, 40 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बंदोस्तात ही कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विषेश) विकास ढाकणे, उप आयुक्त अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन
विभाग माधव जगताप, उप आयुक्त परिमंडळ-4 प्रसाद काटकर यांच्या नियंत्रणाखाली व त्यांच्या उपस्थितीत
महापालिका सहायक आयुक्त ढवळे, करचे, प्रभारी उप आयुक्त विजय दाभाडे, उप आयुक्त पथ विभाग आदिल तडवी,
उप आयुक्त विद्युत विभाग निलेश कालेकर, उप आयुक्त हनुमान खलाटे, ज्ञानेश्वर सोनवलकर, नामदेव बजबळकर
यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every updateहे देखील वाचा

Mrunal Thakur Airport Look | मृणाल ठाकूरच्या एरपोर्टवरील स्टनिंग ब्लॅक लूकने सोशल मीडियावर लावली आग..