Pune PMC ITI | पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाणार

ओरीसातील आयटीआयच्या धर्तीवर कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उपाययोजना राबविणार - अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Pune PMC ITI | काळाच्या बरेच मागे असलेले महापालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण विद्यालय (आयटीआय) आता कात टाकण्याची चिन्हे आहे. आयटीआयमध्ये देशात अग्रेसर असलेल्या ओरिसाच्या धर्तीवर महापालिकेच्या आयटीआयमध्ये नवीन तंत्रज्ञान, अभ्यासक्रम व अत्यावश्यक सोई-सुविधा देण्यात येणार आहेत. या माध्यमातून नवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये औद्योगिक क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आश्‍वासक पावले उचलली आहेत.(Pune PMC ITI)

 

शुक्रवार पेठेमध्ये महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विद्यालय आहे. एकीकडे स्टार्टअप इंडियासारख्या योजना असताना तसेच औद्योगीक नगरी असतानाही प्रशासनाने याठिकाणी पारंपारिक शिक्षणा पलिकडे फारसे प्रयत्न केले नाहीत. विशेष असे की, लोकप्रतिनिधींनी देखिल गांभीर्य दाखविले नाही. महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) संबंधित आयटीआयची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विद्यालयाची दुरावस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काही प्रमाणात निधी मंजुर करुन तेथे दुरुस्ती केली. (Pune PMC ITI)

 

भौतिक सुविधांसोबतच अधुनिक तंत्रज्ञानाधारीत शिक्षणही येथे देण्यासाठी त्यांनी आयटीआयचे प्राचार्य आणि त्यांच्या सहकार्‍यांना सुचविले. त्यानुसार विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मुळे, प्रभारी पर्यवेक्षक निलेश पवार व शाळाप्रमुख सुरेश विधाते यांना ओरीसा येथील आयटीआय पाहण्यासाठी पाठविले. तेथे नुकतीच भेट देऊन आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आयटीआयचा चेहरामोहरा बदलण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या.

आयटीआयचे प्रभारी प्राचार्य प्रमोद मुळे म्हणाले, ओरीसामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे आयटीआय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, सोई-सुविधा, प्रात्यक्षिके, शासनाचे मोबाईल ऍप, महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम, बेकर्स अभ्यासक्रम असे वैविध्यपुर्ण अभ्यासक्रम तिथे उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये कुशल मनुष्यबळ तयार होऊन त्यांना नोकरीची चांगली संधी मिळत आहे. त्याच धर्तीवर महापालिका आयटीआयमध्येही बदल केला जाईल.

 

पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये ४० टक्के मनुष्यबळ ओरीसामधुन येते. त्यामुळे तेथील आयटीआय प्रकल्पाची मी पाहणी केली, त्याच पद्धतीने महापालिकेचे आयटीआय व्हावे, इथल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, नोकरी मिळावी, या हेतूने शिक्षकांना ओरीसा येथे पाठवून अभ्यास करायला सांगितले. आता पर्यंत ३० टक्के पायाभुत सुविधांचे काम आम्ही केले आहे. उर्वरीत काम लवकरच करु.

– विकास ढाकणे, अतिरीक्त महापालिका आयुक्त.

 

Web Title :  Pune PMC ITI | Modern technology education will be given in ITI of Pune Municipal Corporation-Vikas Dhakne


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा