Attack On Girl In Sadashiv Peth Pune | कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांचा पुणे शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देवून सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Girl In Sadashiv Peth Pune | शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव पेठ येथे एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी त्या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या तरुणांचा पुणे शहर शिवसेनेच्या (Pune Shivsena) वतीने शिवसेना भवन येथे जाहीर सत्कार करून त्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात आली. त्या तरुणीला मारलेल्या कोयत्याचा पहिला वार अंगावर घेणारा शेखर सगळगिळे याचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्याला 25000₹ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच त्याच्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. (Attack On Girl In Sadashiv Peth Pune)

 

 

यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) म्हणाले की, तरुणींवर होणाऱ्या हल्ल्याने आता नागरिकांनी सजग होण्याची वेळ आली असून या तरुणांनी केलेल्या धाडसामुळे त्या तरुणीचा जीव वाचला आहे. आपल्या माता भगिनींचा जीव वाचवणं हे परम कर्तव्य समजणं या कृतीचं करावं तेवढं कौतुक कमी असून येणाऱ्या काळात पुणे शहरात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना मदत कक्ष स्थापन करण्यात येत असून पुणे शहरातील माता-भगिनींना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी तात्काळ शिवसेना मदत कक्षाशी संपर्क करावा, तातडीने त्यांना संबंधित मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी मदतीसाठी तातडीने उपलब्ध राहतील. (Attack On Girl In Sadashiv Peth Pune)

 

 

 

यावेळी पुणे शहराचे शिवसेना उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, प्रमोद प्रभुणे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजाताई रावेतकर, उपशहर प्रमुख श्रुती ताई नाझीरकर व महिला आघाडीच्या उमाताई कांबळे, युवासेना उपशहरप्रमुख गौरव साइनकर, नवनाथ निवंगुणे, शहर समन्वयक शंकर संगम, डेव्हीड खोडे कैवल्य पासलकर उपस्थित होते

 

 

 

Web Title :  Attack On Girl In Sadashiv Peth Pune | Pune Shiv Sena honors the youth who saved the life of a young woman in the Koyta attack by giving financial assistance


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा