Pune PMC News | समाविष्ट 34 गावांतील विकासकामांचा अहवाल तयार करण्याच्या समितीमध्ये 12 जणांना संधी मिळणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अहवाल तयार करण्यासाठी १२ जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज, पावसाळी गटारे, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, आरोग्य व अन्य सुविधांची वस्तुस्थिती, आवश्यक कामे, महापालिकेने केलेली निधीची तरतूद आणि राज्य शासनाकडून अपेक्षित निधी असा विस्तृत आराखडा तयार करण्याचे काम या समितीकडे असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

राज्य शासनाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao) यांच्या अध्क्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि महापालिकेच्या संबधित झोनचे उपायुक्त उपस्थित होते. ३४ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. परंतू मागील चार पाच वर्षात या गावांमध्ये अपेक्षित विकासाची कामे झालेली नाहीत. गावातील नागरिक पुर्वीपेक्षा अधिकचा कर देत असूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत. शहरातील आमदारांनीही विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित केला आहे. यानंतर राज्य शाससाने समाविष्ट गावांतील सेवा,

सुविधांचा समग्र अहवाल तयार करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल अधिकारी स्तरावर पहिली बैठक झाली.
या बैठकीमध्ये अहवाल कशा पद्धतीने तयार करायचा यासोबतच प्रत्येकी तीन गावांतून एक यापद्धतीने
१२ सदस्यांना समितीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title : Pune PMC News | 12 people will get a chance in the committee to prepare a report on
the development works of the 34 villages involved

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शिंदे गटात नाराजी, विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतलं; बच्चू कडूंनी बोलून दाखवली खदखद

Actress Sakshi Malik | ‘बम डिगी डिगी’ फेम अभिनेत्री साक्षी मलिकने शेअर केले हॉट फोटोशुट

NCP Chief Sharad Pawar | ‘घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’, शरद पवारांची चौफेर फटकेबाजी