NCP Chief Sharad Pawar | ‘घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’, शरद पवारांची चौफेर फटकेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कर्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले. काही केलं तर पक्ष (Party) आणि पक्ष चिन्ह (Party Symbol) जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी बोलून दाखवला. जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही, असा टोलाही शरद पवारांनी बंडखोरांना लगावला.

सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना लगावला आहे. साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. असे विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर शरद पवारांनी (NCP Chief Sharad Pawar) प्रत्युत्तर दिलं.

पक्षाचे चिन्ह जाणार नाही

राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणूक लढलो त्याचे चिन्ह होते बैल जोडी, त्यानंतर गाय-वासरु चिन्ह, त्यानंतर चिन्ह मिळाले चरखा नंतर हात या चिन्हावर निवडणूक लढलो. चिन्ह जाणार नाही आणि जाऊ देणार नाही. चिन्हे कोण घेऊन जाऊ शकत नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

माझ्याशिवाय नाणं वाजणार नाही

आज काही जणांनी मेळावा घेतला, त्यात सर्वात मोठा फोटो माझा होता. त्यांना माहिती आहे की त्यांचं नाण वाजणार नाही, त्यामुळे फोटोचा वापर केला जातोय, असेही शरद पवार म्हणाले. त्यांनी काही भाष्य केले त्यावर मी काही बोलणार नाही. आज मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर लावले त्यात माझा फोटो होता. त्यांना माहीत आहे आपलं नाण चालणार नाही, पण पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही थांबवू शकत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

भाजपसोबत गेले ते संपले

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी अनेकवेळा भाष्य केले वेगळा विदर्भ केला पाहिजे. मात्र आज काय झालं विदर्भाबाबत काही करत नाहीत, असे शरद पवार म्हणाले, भाजपसोबत (BJP) गेले ते संपले आहेत. भाजपकडून विरोधी पक्ष फोडण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

जाणीवपूर्वक दंगली केल्या

शिवसेनेचे (Shivsena) हिंदुत्व 18 पगड जातींना घेऊन जाणारे आहे. भाजपचे हिंदुत्व विखारी, मनुवादी आणि विद्वेषक आहे. भाजपचे हिंदुत्व समाजात फूट पाडणारे आहे. राज्यात दंगली घडल्या, दंगलीत कोण होतं हे लोकांना माहीत आहे. जाणीवपूर्वक यांनी दंगली केल्या. जाती आणि धर्मांमध्ये अंतर वाढवतो तो राष्ट्रवादी नसतो, समाजात फूट पाडतो तो राष्ट्रवादी नसतो, राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

हो खरं आहे, नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला

शरद पवार यांनी नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला आहे, तर महाराष्ट्रात पाठिंबा दिला तर काय बिघडले? असाही प्रश्न अजित पवार यांच्याकडून उपस्थित केला होता. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आम्ही नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला. हो हे खरे आहे आम्ही भाजपला पाठिंबा दिला. तिथे आमचे सात आमदार निवडून आले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मणिपूर, नागालँड ही राज्ये चीनच्या सीमेला लागून आहेत पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या (China) सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये निर्णय घेताना बारकाईने विचार करावा लागतो. या राज्यात जर काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फायदा बाहेरील देश घेतात. त्यामुळे आम्ही तेथील सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला. पण हे लोक तर सरकारमध्ये जाऊन बसले.

Web Title : NCP Chief Sharad Pawar | sharad pawar vs ajit pawar sharad pawar on ajit pawar chagan bhujbal and bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम

Ajit Pawar | तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल