Pune PMC News | निविदेमध्ये कोणताही तपशील नसल्याने पालिकेचा 36 लाखांचा ‘तो’ प्रस्ताव ठरणार वादग्रस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | शहरामधील झाडाझुडपांची हिरवळ कमी झाली असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) देखील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षरोपण करत असते. मात्र सध्या पालिकेकडून पूर्वी लावण्यात आलेल्या झाडांच्या देखभालीसाठी आणि संवर्धनासाठी लाखो रुपयांचा प्रस्ताव काढण्यात आला आहे. पालिकेने काढलेला हा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. शहरातील झाडांचे संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेने (Pune PMC News) 36 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र यामध्ये कोणत्या विभागातील कोणती झाडे आणि किती झाडांचे संवर्धन करण्यात येणार आहे असा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. आणि विशेष बाब म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आलेली ही निविदा मान्यतेसाठी आता स्थायी समितीपुढे (Standing Committee) ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये नक्कीच काही तरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुणे महापालिका शहरातील वेगवेगळ्या परिसरामध्ये वृक्षांचे रोपण आणि त्यांचे संवर्धन करत असते. यामध्ये सध्या शहरात 51 लाख 37 हजार 632 झाडांची नोंद करण्यात आली असून यामध्ये 430 विविध प्रजातींचे वृक्ष असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीमध्ये सांगण्यात येत आहे. यापुढे देखील पालिकेकडून मेट्रो आणि मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेअंतर्गत आणखी 70 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) यापूर्वी लावण्यात आलेल्या झाडांच्या देखभालीसाठी आणि संवर्धनासाठी 36 लाखांचा खर्च असणारा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या या प्रस्तावावरुन वाद निर्माण होणार असून हा प्रस्ताव वादग्रस्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील आधी लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धानासंबंधात पालिका प्रशासनाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये निविदा काढली होती. 28 फेब्रुवारी ते 9 मार्च या दरम्यान सदर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. ती 10 मार्च रोजी उघडण्यात आली. मात्र, ही निविदा मान्यतेसाठी यावर्षीच्या नव्या आर्थिक वर्षात (2023-24) ठेवण्यात आली आहे. या निविदेमध्ये मात्र कोणत्या विभागातील कोणती झाडे आणि किती झाडांचे संवर्धन व देखभाल करण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. या निविदेबाबत ठोस माहिती पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देखील नाही. त्यामुळे ही निविदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली असून यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मार्च महिन्यात काढलेल्या या निविदेला सहा महिन्यांनी मान्यता देण्याचा आश्चर्यकारक प्रकार महापालिका (Pune PMC News) करणार आहे. त्यामुळे या निविदेबाबत संशय निर्माण केला जात आहे.

महापालिकेकडून रोपण करण्यात येणाऱ्या झाडांची माहिती ठेवणे हे गरजेचे असते. तसेच वृक्ष गणना करताना झाडांचे स्थान,
प्रकाशचित्रे, शास्त्रीय नाव, झाडाची उंची, खोडाचा घेर आदी तपशील नोंदवून घेणे आवश्यक आहे.
हीच बाब झाडांचे संवर्धन करतानाही बंधनकारक आहे. मात्र, निविदा प्रसिद्ध करताना आणि मंजुर करताना अशा
प्रकारची कोणतीही माहिती न देता फक्त मंजुरीचा धडाका लावण्यात आला आहे. पालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे
दुर्लक्ष होत असल्याची बाब यामधून दिसून येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On Maharashtra Govt | गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?, सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल