Pune PMC School | इंटरनेट सेवा नसल्याने महापालिकेच्या शाळांमधील ई लर्निंग बंद ! रिलायन्स जिओची सेवा मिळाल्यानंतर ई लर्निंग पुन्हा सुरू होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC School | महापालिकेच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ई -लर्निंग यंत्रणा (E-learning System) बंद स्थितीत आहे. शाळा सुरू होउन एक महिना होत आला आहे, मात्र इंटरनेटची (Internet) सुविधाच नसल्याने ही यंत्रणा बंद आहे. दरम्यान,रिलायन्सच्या जिओ कंपनीने देशभरातील स्थानीक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या शाळांना मोफत इंरटनेट सेवा देण्याची घोषणा केली असून महापालिका प्रशासनाने या सेवेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, यानंतरही पावसाळा संपेपर्यंत तरी अनेक शाळा ई लर्निंग शिक्षण देण्यापासून दूरच राहातील, असे दिसत असल्याची माहीत प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली. (Pune PMC School)

 

शहरात महापालिकेच्या विविध माध्यमांच्या २६५ शाळा असून त्यामध्ये गरिब कुटुंबातील सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी मागील काही वर्षात चांगले प्रयत्न झाले आहेत. यामध्ये विद्या निकेतन, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, क्रिडा निकेतन, संगीत विद्यालय यासोबतच अधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेल्या ई लर्निंगसाठी प्रयत्न झाले आहेत. साधारण सात ते आठ वर्षांपासून ई लर्निंग च्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येत इयत्तेनुसार अभ्यासक्रमाची सॉफ्टवेअर तयार करण्यात आली. २६५ शाळांतील वर्गखोल्यांमध्ये टीव्ही संच (स्क्रिन) तसेच शाळांसाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Pune PMC School)

 

सुरवातीला बीएसएनएल या शासकिय कंपनीकडून सेवा घेण्यात आली. कोरोनामध्ये शाळा बंद राहील्याने ही सेवा काहीशी विस्कळीत राहीली. मागील वर्षीही त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. किमान यावर्षी सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने पहिल्या दिवसापासून ई लर्निंग सुरू होईल, असे वाटत होते. परंतू महिना उलटल्यानंतरही ही यंत्रणा बंदच आहे. यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता, इंटरनेट सेवा बंद असल्याने ई लर्निंग बंद आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला कळविण्यात आले आहे. प्रशासनानेही पैसे भरून बीएसएनएलची सेवा घेण्याऐवजी रिलायन्स कंपनीने देशभरातील स्थानीक स्वराज्य संस्थांना मोफत इंटरनेट सेवा देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स कंपनीच्या जिओ इंटरनेटसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेतील अधिकारी सांगत आहेत.

जिओ कंपनीने होकार कळविल्यानंतर शिक्षण मंडळ आणि संबधित शाळेच्या
परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना जिओच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करून जेथे
तातडीने इंटरनेट सेवा देणे शक्य आहे, तेथे तातडीने ती पुरवावी. पावसाळ्यामुळे
खोदाईला परवानगी नसल्याने पावसाळा संपेपर्यंत काही शाळांमध्ये तूर्तास इंटरनेट सेवा पुरविता येणार नाही, ही वस्तुस्थिती देखिल प्रशासनातील अधिकार्‍यांनी सांगितली. त्यामुळे येत्या काही दिवसांत महापालिकेच्या काही शाळांमध्ये जिओच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध झाली तरी बहुतांश शाळा पुढील काही महिने यापासून वंचित राहाण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title : Pune PMC School | E-learning in municipal schools closed due to lack of internet service!
E-learning will resume after Reliance Jio service is available

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा