Maharashtra Politics News | ‘देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललात तर…’, भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले – ‘हा कलंकित करंटा…’ (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी (दि.10) नागपूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. तसेच ‘नागपूरचा कलंक’ असा उल्लेख केला होता. यावरुन भाजपचे नेते (BJP Leader) आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळून, त्यांच्या पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन (Protest) केले जात आहे. (Maharashtra Politics News) याच दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आह. तसेच उद्धव ठाकरेंचा ‘कलंकित करंटा’ असा उल्लेख केला आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा पाढा वाचत उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे हा ‘कलंकित माणूस’ असल्याचे म्हणत इशारा दिला. यापुढे तुम्ही असं काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने मारेल. उद्धव ठाकरे यांनी ओबीसी (OBC) आणि मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) घालवलं, मेट्रो सारखे प्रकल्प (Metro Project) बंद पाडले, हा ‘कलंकित करंटा’ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान करतो. हा ‘कलंकित करंटा’ सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) लोकांना साथ देतो, अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. (Maharashtra Politics News)

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मनोरुग्णालयात जा,
नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला.
परंतु यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.
आता रस्त्यावर आंदोलन केलं आहे. पुढचं आंदोलन तुम्हा माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार तुम्ही असाल, असा इशारा बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

 

 

 

Web Title : Maharashtra Politics News | chandrashekhar-bawankule-says-will-protest-aggressively-against-uddhav-thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा