Pune PMC Skysign Department | पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची जाहीरात फलक आणि नाम फलकात गल्लत ! व्यापार्‍यांना दुकानांवरील पाट्यांसाठी पाठविल्या जाहीरात फलक दराने पैसे भरण्याच्या नोटीसेस

पुणे व्यापारी महासंघाच्या आक्रमक पावित्र्यानंतर प्रशासनाचे आस्ते कदम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Skysign Department | महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून नाम फलक आणि जाहीरात फलक यात गफलत करीत आहे. याचा नाहक त्रास व्यापार्‍यांना सहन करावा लागत आहे. नामफलकांसदर्भातील विविध प्रश्नांवर लवकरच तोडगा काढला जाईल असे आश्वासन महापालिका प्रशासनाने पुणे व्यापारी महासंघाच्या (Pune Vyapari Mahasangh) प्रतिनिधींना दिले. (Pune PMC Skysign Department)

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून नामफलक परवाना नुतनीकरणासाठी प्रति चौरस फुटास ५८० रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. त्यास पुणे व्यापारी महासंघाने विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी दुकानावरील नामफलक, बोर्ड हे शुल्क मुक्त केले होते. तसेच त्याच्या आकारावरील निर्बंध शिथिल केले होते. त्यानंतर या परीपत्रकास मुदतवाढ दिली गेली नाही. यामुळे महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून नवीन दरानुसार ही आकारणी सुरु केली आहे.

नियमानुसार तीन फुट उंच आणि दहा फुट लांब एवढ्या आकाराचा नामफलक उभारण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक आकाराचा नामफलक असणार्‍या, तसेच दुकानाच्या भिंतीवर फसाड लावून उभे केलेल्या नामफलक असणार्‍या दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. अडीच महीन्यापुर्वी हा विषय समोर आला होता. त्यानंतर कारवाई थंडावली होती. सध्या सणाचे दिवस सुरु झाल्यानंतर महापालिकेकडून पुन्हा नोटीस देणे, दुकानात जाऊन पाहणी करण्यास आकाश चिन्ह विभागाच्या कर्मचार्‍यांनी सुरुवात केली आहे. यापार्श्वभुमीवर महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सरचिटणीस महेंद्र पितळीया , नितीन काकडे, मिलींद शालगर , अजित सांगळे आदींचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेतली. (Pune PMC Skysign Department)

राज्य सरकारने सुट दिल्यानंतरही महापालिकेने व्यापार्‍यांकडून शुल्क घेतले आहे,
असा दावा महासंघाच्या प्रतिनिधींनी केला. यापुर्वी गेल्या कित्येक वर्षांपासून दुकानांवरील जाहिरातीचे फलक,
बोर्डकरीता प्रतिचौरस फुटास १११ रुपये दर आकारत आहे. तोच दर कायम ठेवण्यात यावा, प्रतिचौरस फुटासाठी ५८० रुपये दर आकारणी अत्यंत चुकीची आणि बेकायदा आहे अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. तसेच सध्या नामफलक हे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत लिहीण्याचे बंधन आहे. फलकावर जीएसटी क्रमांकही नमूद करण्याचे बंधन आहे. यामुळे ३ फुट बाय दहा फुट रुंद हा आकार लहान पडत आहे. सध्या काही कापड – वस्त्रे , सराफ, इलेक्ट्रॉनिक वस्तु आदींची दुकानांची समोरील बाजुही जास्त रुंद आहे. यामुळे या दुकानांवर सदर नियमानुसार बोर्ड लावला तर तो लहान दिसेल यामुळे आकाराची मर्यादा वाढवावी अशा विविध मागण्या महासंघाच्या प्रतिनिधींनी केल्या.

यासंदर्भात अतिरीक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
यासंदर्भात एक सविस्तर प्रस्ताव तयार केला जाईल,
त्यामध्ये व्यापार्‍यांकडून काही सुचना घेतल्या जातील असे आश्वासन महासंघाला दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भीमाशंकर मंदिरात पुजेच्या संधीवरुन पुजाऱ्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी,
36 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल (Video)