Pune Crime News | भीमाशंकर मंदिरात पुजेच्या संधीवरुन पुजाऱ्यांमध्ये लाठ्याकाठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी, 36 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर (Bhimashankar Temple) येथे पुजाऱ्यांमध्ये पुजेच्या संधीवरुन लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. शिवलिंगावर अभिषेक, पुजा करुन फुले वाहणाऱ्या पुजारी गुरव यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी (Pune Police) 36 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

शंकर गंगाराम कौदरे (वय-65 रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 21 जणांविरुद्ध तर गोरक्ष यशवंत कौदरे (रा. भीमाशंकर, ता. खेड) यांच्या तक्रारीवरुन विरोधी गटातील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांसमोरच हा प्रकार घडल्याने भीमाशंकर प्रशासनाची मान शरमेने खाली गेली आहे.

नेमकं काय झालं?

भीमाशंकर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात असलेल्या शनि मंदिरात पुजा करण्यावरुन पुजाऱ्यांमध्ये वाद आहे. सोमवारी दुपारी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी हा वाद विकोपाला गेला. एका गटाने पुजेला बसलेल्या पुजाऱ्याला उठवून त्या ठिकाणचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही गटात बाचाबाची झाली. याचे रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झाले. (Pune Crime News)

दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप, खुर्ची जे हातात येईल त्याने एकमेकांना मारण्यास सुरुवात केली.
यामध्ये काही पुजारी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांना विचारणा
केली असता, त्यांनी सांगितले की चालू पुजेत अडथळा आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला.
परंतु, यावर सामोपचाराने तोडगा काढला जाईल. हे सर्व लोक आमचेच आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले – ‘आरोपामागे भाजपचा हात, अजितदादांची ताकद…’