Pune PMC Transfer Of Engineers | पुणे महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या, 132 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश, जाणून घ्या कारण

Pune PMC Transfer Of Engineers | transfers of engineers in Pune Municipal Corporation, including 132 junior engineers, know why
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Transfer Of Engineers | पुणे महानगरपालिकेत अनेक वर्षापासुन एकाच विभागात काम करणार्‍या तब्बल 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या प्रशासनाने बुधवारी तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत तसेच यांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. दरम्यान, लवकरच अधीक्षक आणि लेखनिकांच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune PMC Transfer Of Engineers)

मनपामधील वर्ग 1 ते 3 मधील कोणत्याही अधिकार्‍याची 3 वर्षानंतर संबंधित विभागातून दुसर्‍या विभागात बदली करावी असा कायदा आहे. अनेक वर्षापासुन एकाच विभागात राहुन संबंधित अधिकार्‍यांचे तेथे हितसंबंध निर्माण होऊनयेत असा बदल्याच्या मागे हेतू होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून मनपामध्ये अशा बदल्या झालेल्या नाहीत. सुमारे 6 वर्षे संबंधितांच्या बदल्या झाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना निवेदन सादर करून तात्काळ बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. त्यांनी मनपातील बदली धोरणाला धाब्यावरून बसवून बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील केला होता (Pune Municipal Corporation Transfers 132 Junior Engineers After Financial Allegations). त्यानंतर आता प्रशासनाने तब्बल 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. (Pune PMC Transfer Of Engineers)

स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अशा एकुण 132
कनिष्ठ अभियंत्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेल्या अभियंत्यांना बदलीचा आदेश देखील तात्काळ दिल्याची माहिती सामान्य प्रशासन
विभत्तगाचे उपायुक्त सचिन इथापे (Sachin Ithape PMC) यांनी दिली आहे.
आता लवकरच लिपिक आणि अधीक्षक पदावरील बदल्या करण्यात येणार असल्याचे इथापे यांनी सांगितले आहे.

Web Title :-   Pune PMC Transfer Of Engineers | transfers of engineers in Pune Municipal Corporation, including 132 junior engineers, know why

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी

Post Office Schemes 2023 | ‘या’ बचत योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज, मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना फायदा

Total
0
Shares
Related Posts