Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML Bus News | प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी – PMPML) कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 (Kothrud Stand To Hinjawadi Maan Phase-3) आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे (Sangvi To Symbiosis Hospital Lavale) या 2 मार्गावर दि. 28 एप्रिलपासून नव्याने पीएमपीची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. (Pune PMPML Bus News)

कोथरूड आणि परिसरातून हिंजवडी येथे नोकरीसाठी जाणार्‍या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सदरील मार्गावर पीएमपी बसची सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून लवळे येथील सिम्बायोसिस हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचण येत होती म्हणुन या दोन्ही मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. (Pune PMPML Bus News)

कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 ही पीएमपी बस कोथरूड डेपो (Kothrud Bus Depot),
चांदणी चौक (Chandani Chowk), वाकड पूल (Wakad Bridge) आणि बाणेर (Baner) मार्गे धावणार आहे
तर सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे ही पीएमपी बस पिंपळे गुरव (Pimple Gurav), वाकड, बालेवाडी
(Balewadi), सूस गाव (Sus Gaon) आणि पिंपरी (Pimpri) या मार्गे धावणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून (PMPML Administration) देण्यात आलेली आहे.

Web Title :- Pune PMPML Bus News | PMPML bus service on 2 new routes Kothrud Stand to Hinjewadi Maan Phase-3 and Sangvi Gaon to Symbiosis Hospital Lavale, Know Route

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला