Pune PMPML News | दहीहंडीमुळे पुणे शहरातील काही पीएमपी बसमार्ग बंद; ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMPML News| पुणे शहरामध्ये गणेशोत्सवासह दहीहंडी उत्सव देखील जोरदार साजरा केला जातो. येत्या 7 सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव (Dahihandi 2023) जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जाणार असून शहरामध्ये आत्ताच ठिकठिकाणी मांडव घालण्यास सुरुवात झाली आहे. दहीहंडीमुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये लाखो लोक जमा होत असतात. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. याचबरोबर शहरातील पीएमपीएमएल बससेवेच्या मार्गामध्ये (Pune PMPML News) देखील बदल करण्यात आले आहे. तसेच काही रस्त्यावरील बससेवा बंद (PMPML Bus Route) करण्यात आली आहे.

बससेवेचे हे आहेत पर्यायी मार्ग

  1. बसमार्ग क्र. 50: शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून संचलनात राहतील.
  2. बस मार्ग क्र. 113: अ.ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर म.न.पा. भवन स्थानकावरून संचलनात राहतील.
  3. बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143, 144, 144 अ या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, म.न.पा. भवन, गाडीतळ (जुना बाजार) या मार्गाने संचलनात राहतील.
  4. मार्ग क्र. 174: 6 आणि 7 सप्टेंबर रोजी रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ (जुना बाजार) म.न.पा., डेक्कन मार्गे संचलनात राहील.
  5. बस मार्ग क्र. 2 , 2 अ, 10, 11, 11अ, 11 क, 13, 13 अ, 28, 30 , 20, 21, 37, 38, 88, 216, 297, 298, 354, रातराणी-1, मेट्रो शटल-12: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर शिवाजीनगरकडुन स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रोड, डेक्कन, टिळक रोड मार्गे संचलनात राहतील. मात्र स्वारगेटकडुन शिवाजीनगरला जाताना वरील मार्गावरील बसेस मार्गाने बाजीराव रोडने संचलनात राहतील.
  6. बस मार्ग क्र. 7, 197, 202: या मार्गाच्या बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  7. बस मार्ग क्र. 68: या मार्गाचे बसेस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता स्वारगेट, टिळक रोड या मार्गाने संचलनात राहतील.
  8. स्वारगेट आगाराकडुन बस मार्ग क्र. 3 आणि 6 : हे दोन बस मार्ग दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

दहीहंडी निमित्त बससेवेच्या मार्गामध्ये हे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मार्गामध्ये बदल झाल्यामुळे जेष्ठ नागरिकांची व कामगार वर्गाची या दिवशी गैरसोय होऊ शकते. नागरिकांना होणाऱ्या त्रासासाठी PMPML प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, पीएमपीने (Pune PMPML News) केलेल्या बदलाला नागरिकांनी सहकार्य करावं, असंही आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | भोर आणि वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवा