Pune Police Banned Drone | पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोन बंदी आदेश लागू, सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांची खबरदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Banned Drone | पुणे गणेशोत्सवामध्ये ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ शूट करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करणे महागात पडू शकतं. पुण्यात गणेशोत्सव काळात ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी शहरात ड्रोन बंदी आदेश लागू केला आहे.(Pune Police Banned Drone)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक ड्रोन व्हिज्युअल्स अपलोड करण्यात आल्याचे पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.
त्यानंतर पुणे शहर पोलिसांनी गणेश उत्सव काळात ड्रोनचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी आदेश जारी करुन सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सव काळात ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे. परंतु शहर पोलीस पाळत ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ड्रोन आणि उडत्या वस्तूंना या आदेशातून सूट दिली आहे. (Pune Police Banned Drone)

उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

गणेशोत्सवादरम्यान लक्ष्मी रोड येथे ड्रोनद्वारे व्हिडिओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी ड्रोन बंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात Aircraft Act, Drone Rule, IPC कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

यावर देखील बंदी?

गणेशोत्सवादरम्यान ड्रोन, मायक्रो लाईट्स, हॅड ग्लायडर, पॅरामोटर, हॉट एअर बलूनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळांमध्ये हजारो लोक येतात.
या भाविकांच्या सुरक्षेच्या कारणामुळे ड्रोनवर बंदी घातली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation – Kunbi Caste Certificate | मराठा आरक्षण व मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत विधिज्ञ व अभ्यासकांची तज्ञ समिती स्थापन; सद्यस्थितीत आंदोलन नव्हे तर कायदेशीर लढा ताकदीने लढण्याची आवश्यकता, आरक्षण परिषदेत बहुतांश तज्ञांचा सूर