Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) भवानी पेठ (Bhavani Peth) परिसरातून एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख 40 हजार रूपये किंमतीचे एमडी Methylenedioxymethamphetamine (MDMA) जप्त केले आहे. त्याच्याविरूध्द समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch)

मुजाहिद अन्वर शेख Mujahid Anwar Shaikh (25, रा. गोल्डन सिटी, एस.आर.ए. कॉलनी, रोशन मस्जिद जवळ, भवानी पेठ, पुणे) असे अटक केलेल्याची नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी अंमली पदार्थ विेराधी पथकातील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस नाईक साहिल शेख आणि पोलिस अंमलदार अझीम शेख यांना आरोपी हा अंमली पदार्थाच्या विक्री करिता रोशन मस्जिद जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Police Crime Branch)

पोलिस पथकाने सापळा रचुन मुजाहिद अन्वर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 लाख 40 हजार रूपये किंमतीचे एमडी आणि 10 हजाराचा मोबाईल असा एकुण 10 लाख 50 हजार रूपयाचा माल जप्त केला. त्याच्याविरूध्द समर्थ पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक डीएल चव्हाण (PSI DL Chavan), सहाय्यक उपनिरीक्षक घुले, पोलिस हवालदार संतोष देशपांडे, संदीप जाधव, साहिल शेख, अझीम शेख, मयूर सूर्यवंशी, योगेश माढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, दिशेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :  Pune Police Crime Branch | Narcotics worth 10 lakh 50 thousand seized from Bhavani Pethe, one arrested by crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Maharashtra Cabinet Decision | वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला सावरकरांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Actress Sonnalli Seygall | अभिनेत्री सोनाली सेहगल मालदीवमध्ये एन्जॉय करतीये हनीमून; फोटो केले पोस्ट