Actress Sonnalli Seygall | अभिनेत्री सोनाली सेहगल मालदीवमध्ये एन्जॉय करतीये हनीमून; फोटो केले पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमध्ये सलग 12 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सोनाली सेहगल (Actress Sonnalli Seygall) ही सध्या चर्चेत आहे. सोनाली 7 जूनला उद्योजक आशिष सजनानीबरोबर (Ashish Sajnani) लग्नगाठ बांधली. गेली 5 वर्षे ते एकमेंकांना ओळखत होते पण अभिनेत्री सोनालीने आपल्या नात्याची माहिती दिली नव्हती. तिने थेट लग्न केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. आता अभिनेत्री सोनाली सेहगल (Actress Sonnalli Seygall) हिने आपल्या हनिमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली सेहगल तिचा पती आशिष सोबत (Sonnalli And Ashish) मालदीवमध्ये (Maldives) क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. तिने हनीमून (Sonnalli Seygall Honeymoon Photo) एन्जॉय करतानाचा फोटो ऑफिशियल इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटमध्ये ती मालदीवच्या समुद्रात बोटीवर असून यावेळी तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा स्लिट गाऊन ड्रेस घातला आहे. तिच्या या फोटोमध्ये सर्वात लक्षवेधी तिचे मंगळसुत्र ठरत आहे. हनिमुनच्या फोटोमधील तिचे मंगळसूत्र चाहत्यांना पसंत पडले आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

‘प्यार का पंचनामा’ (Pyaar Ka Punchnama) या हिट चित्रपटातून अभिनेत्री सोनाली सेहगल (Actress Sonnalli Seygall) हिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटामुळे ती लोकप्रिय झाली. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून फोटो शेअर करत असते. तिने ‘वेडिंग पुलाव’ (Wedding Pulao), ‘प्यार का पंचनामा 2’, ‘जय मम्मी दी’ (Jai Mummy Di), सोनू की टिटू की स्विटी (Sonu Ki Titu Ki Sweety), नूरानी चेहरा (Noorani Chehra) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

 

Web Title :  Actress Sonnalli Seygall | sonnalli seygall is celebrating honeymoon with husband in maldives

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा