पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट-2 ने बेकायदा पिस्टल बाळगणार्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 पिस्टल, 8 जिवंत काडतुसे आणि सॅन्ट्रो कार जप्त (Pistol Seized) करण्यात आली आहे. (Pune Police Crime Branch News)
हनुमंत मोतीराम पवार Hanumant Motiram Pawar (31, रा. संत तुकाराम नगर, येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) आणि ऋषिकेश सुदाम बोत्रे
Rishikesh Sudam Botre (29, रा. मु.पो. खाळुंद्रे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेतील युनिट-2 चे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे युनिट-2 च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार गजानन सोनुने यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांच्याकडे अग्नीशस्त्रे असल्याचे देखील समजले. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. (Pune Police Crime Branch News)
पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 2 पिस्टल आणि 8 जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी अग्नीशस्त्रांसह सॅन्ट्रो कार जप्त केली आहे. पोलिसांनी एकुण 1 लाख 76 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी ऋषिकेश सुदाम बोत्रे याच्याविरूघ्द चाकण पोलिस स्टेशनमध्ये (Chakan Police Station) अग्नीशस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे
(ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई
(PI Nandkumar Bidwai), सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosale),
सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole), पोलिस अंमलदार गजानन सोनुने, उज्वल मोकाशी, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, उत्तम तारू, साधणा ताम्हाणे, नामदेव रेणुसे, मोहसिन शेख, निखिल जाधव, शंकर नेवसे, विनोद चव्हाण आणि नागनाथ राख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Police Crime Branch News | Crime Branch arrests illegal pistol holders, seizes 2 pistols and 8 live cartridges
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- CM Eknath Shinde | शासन आपल्या दारी कार्यक्रमात राष्ट्रवादीचा झेंडा गायब, एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण (व्हिडिओ)
- 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा;
सॅफरॉन क्रिकेट क्लबची विजयी सलामी ! - 2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा