Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : घरफोडी चोरीचे 80 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास नर्‍हे परिसरातून अटक; 5 गुन्हयांतील 11 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | पुणे शहर परिसरात घरफोडीचे 80 पेक्षा जास्त गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारास पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्याच्याकडून तब्बल 11 लाख रूपये किंमतीचे 20 ग्र्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी दिली आहे. (Pune Police Crime Branch News)

जयवंत उर्फ जयडया उर्फ जेडी गोवर्धन गायकवाड Jaywant alias Jayadia alias JD Govardhan Gaikwad (34, रा. आंबेडकर वसाहत, डी.पी. रोड, सुरज प्रोव्हिजन स्टोअर शेजारी, औंध, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेतील युनिट-3 मधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (Assistant Police Sub-Inspector Santosh Kshirsagar) यांना आरोपी जयंत उर्फ जयडया उर्फ जेडी गोवर्धन गायकवाड हा नर्‍हेमधील (Narhe) भुमकर चौक (Bhumkar Chowk Pune) परिसरात असल्याची माहिती दि. 24 एप्रिल 2023 रोजी मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर युनिट- 3 च्या पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक स्क्रु डायव्हर, एक अ‍ॅडजेस्टेबल पाना आणि एक लोखंडी छोटी चपटी कटावणी मिळून आली. (Pune Police Crime Branch News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat), पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील
(PSI Ajitkumar Patil), पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर, पोलिस हवालदार राजेंद्र मारणे
(Police Havaldar Rajendra Marne), शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते,
राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कट्टे, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, महिला पोलिस सोनम नेवसे आणि
भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

युनिट-3 च्या पथकाने आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सिंहगड रोड पोलिस स्टेशन आणि तळेगाव दाभाडे
पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी 1 तर सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीत 3 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख रूपये किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील करीत आहेत.

Web Title :- Pune Police Crime Branch News | Innkeeper with 80 cases of burglary and theft arrested from Narhe area; Goods worth 11 lakh seized in 5 crimes

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला