Pune Police Inspector Transfer | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची कंट्रोल रूममध्ये बदली; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील एका पोलाद व्यावसायिकाच्या चौकशी प्रकरणात (Steel Businessman Inquiry Case) आर्थिक गुन्हे शाखेतील (EoW Pune) वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख (Senior Police Inspector Wazir Shaikh) यांची नियंत्रण कक्षात (Pune City Police Control Room) बदली (Pune Police Inspector Transfer) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकाच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिले आहेत.

पोलाद व्यवसायिकाच्या चौकशीसंदर्भात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र दिले होते. चौकशीमध्ये काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी कडू यांनी पत्राद्वारे केली होती.

पुण्यातील पोलाद व्यावसायिकाच्या केसमधील तपास अधिकारी यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले. त्यानंतर वजीर शेख यांची तातडीने नियंत्रण कक्षात
(Pune Police Control Room) बदली करण्यात आली.

पुणे शहरातील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी सुरु असून ही चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख
यांच्याकडे होती. या प्रकरणात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यावसायिकाची प्रामाणिक
अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात यावी, अशी विनंती कडू यांनी केली होती.
तसेच वजीर यांच्याकडून तपास काढण्याची मागणी त्यांनी केली होती.
बच्चू कडू यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते.

Web Title :-  Pune Police Inspector Transfer | investigation officer of steel businessman matter transferred control room senior police inspector eow pune police crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात मार्केटयार्ड परिसरात गोळीबार करुन 28 लाखांची रोकड लुटली, दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती