Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती

सावंतवाडी: पोलीसनामा ऑनलाइन – Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी खरेदी विक्री संघाची (Sawantwadi Taluka Sahakari Kharedi-Vikri Sangh Ltd.) निवडणूक आज (दि. 12) पार पडत आहे. यावेळी शिवसेनेला या निवडणुकीत रोखण्यासाठी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) एकत्र आले आहेत.

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकूण 15 जागा आहेत. त्यातील एक जागा बिनविरोध झाली आहे. भाजपचा (BJP) एक उमेदवार निवडून आला आहे. उरलेल्या 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात उभे आहेत. या संघावर सध्या महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पकड आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट एकवटले आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप आणि शिंदे गट जिवाचे रान करत आहेत. (Deepak Kesarkar)

महाविकास आघाडीच्या हातून हा संघ काढून घेण्यासाठी शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अशोक दळवी,
विद्यापान जिल्हा बँक संचालिका विद्या बांदेकर आदी उमेदवार मैदानात आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा खरेदी विक्री संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे विकास सावंत मैदानात आहेत.

सकाळी आठ ते चार मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजनीला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीत 944 सभासद मतदान करुन उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.
दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील निवडणूक असल्याने ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
दीपक केसरकर आज दुपारी सावंतवाडीत दाखल होणार आहेत.

Web Title :-  Deepak Kesarkar | Deepak kesarkar nitesh rane come together bjp wins 1 seat in sindhudurg sawantwadi sangh elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Siddhant Vir Suryavanshi | सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना मोठा झटका, विवियाना मॉल मारहाण प्रकरणी न्यायालयीन कोठडी