Pune Police MCOCA Action | दत्तवाडी, स्वारगेट, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या 20 जणांच्या टोळीविरूध्द ‘मोक्का’

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 35 वी MCOCA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी दत्तवाडी (Dattawadi), स्वारगेट (Swargate), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth) आणि सहकारनगर (Sahakar Nagar) पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणार्‍या तसेच वाहनांची तोडफोड करणार्‍या दत्ता दिपक जाधव (Datta Deepak Jadhav Gang) टोळीतील 20 जणांविरूध्द मोक्का अंतर्गत (Mokka Action) कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 35 संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळयांवर मोक्का कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

 

दत्ता दिपक जाधव (27), सचिन बबन अडसुळ Sachin Baban Adsul (29), ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे Rishikesh Alias Rishi Raju Shinde (24), अमित बाबु ढावरे Amit Babu Dhaware (22), गणेश उर्फ दोडया अनंत काथवटे Ganesha Alias Dodaya Anant Kathawate (22, सर्व रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर, सहकारनगर, पुणे), प्रविण बिभिशन जाधव Pravin Bibhishan Jadhav (34, रा. अण्णाभाऊ साठे नगर, संतनगर, पुणे), ऋषीकेश रवि मोरे Rishikesh Ravi More (24, रा. शिवदर्शन, घर नं. 14, पर्वती, पुणे), बबन अबू अडसुळ Baban Abu Adsul (53, रा. अरण्येश्वर, पुणे),

 

मनोज उर्फ भुनमय उर्फ भैय्या किसन घाडगे Manoj Alias Bhunmay Alias Bhaiya Kisan Ghadge (रा. 26), गणेश दिपक जाधव Ganesh Deepak Jadhav (28), अक्षय मारूती दसवडकर Akshay Maruti Daswadkar (27), अर्जुन उर्फ रोह्या संतोष जोगळे Arjun alias Rohya Santosh Jogle (19), रोहीत उर्फ पप्पु भगवान उजगरे Rohit Alias Pappu Bhagwan Ujgre (20), शेखर उर्फ सोनु नागनाथ जाधव Shekhar alias Sonu Nagnath Jadhav (30, सर्व रा. अण्णाभाऊ साठे नगर Annabhau Sathe Nagar, अरण्येश्वर (Aranyeshwar), पुणे) यांच्यासह 4 अल्पवयीन युवक तसेच फरार असलेल्या दोघांवर म्हणजेच एकुण 20 जणांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Police MCOCA Action)

दि. 27 जुन 2023 रोजी आरोपींनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतील लहुजी शक्ती सेना ऑफिसजवळ दमदाटी करून शिवीगाळ केली होती. त्यानंतर आरोपींनी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करून परिसरात दुचाकी गाडयांची तोडफोड केली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी तब्बल 14 जणांना अटक करण्यात आली आहे तर 4 अल्पवयीन युवक ताब्यात घेण्यात आलेले आहे. पोलिस फरार असलेल्या दोघांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, टोळी प्रमुख दत्ता दिपक जाधव याने आणि त्याच्या इतर साथीदारांसह एक संघटित टोळी तयार करून अनेक सामाईक गुन्हे केले आहेत. अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने स्वतःच्या टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित करण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला आहे. आरोपींनी दत्तवाडी (Dattawadi Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station) आणि सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करण्यासाठी हिंसाचार केला आहे.

सदरील टोळीवर एकुण 6 गुन्हे एकत्र केल्याची नोंद आहे तर 3 गुन्हे स्वतंत्र असे एकुण 9 गुन्हयांची नोंद आहे.
टोळीचा मुख्य सुत्रधार दत्ता दिपक जाधव आणि त्याचे साथीदार हे टोळीचे वर्चस्व व
आर्थिक फायद्याकरिता गुन्हे करीत असल्याचे दिसुन आले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणून सहकारनगर पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र गजेंद्र माळाळे (Sr PI Surendra Gajendra Malale)यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. प्रस्तावाची छाननी करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje) करीत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत तब्बल 35 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे.
आगामी काळात देखील अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Web Title : Pune Police MCOCA Action | MCOCA against a gang of 20 people who were creating terror in
Dattawadi, Swargate, Bharti Vidyapeeth and Sahakarnagar area.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा