Maharashtra Politics News | ‘राज्यात तीन इंजिनचं सरकार, बिघाडीही होऊ शकते’; राजकीय हालचालींवरुन सत्ताधारी आमदाराचं सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी (NCP Rebellion) करुन शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी होऊन दहा दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. मंत्रिपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून (Maharashtra Politics News) रस्सीखेच सुरु आहे. मंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरुन सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. हाच पेच सोडवण्यासाठी अजित पवार बुधवारी (दि.12) दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवर प्रहार जनशक्ती पार्टीचे (Prahar Jan Shakti Party) आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी सरकारच्या भवितव्यावर सूचक वक्तव्य केलं आहे. राज्यात तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकत आणि बिघाडीही होऊ शकते. तसेच काँग्रेसच्या (Congress) काही आमदारांनाही सत्तेत सामील करुन घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

बच्चू कडू पुढे म्हणाले, सध्या थोडा खातेवाटपाचा गोंधळ सुरु असेल, असं मला वाटतं. मी याआधी म्हटल्याप्रमाणे हे सरकार तीन इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार मजबूतही होऊ शकते आणि तीन तिघाडा म्हणून बिघाडाही होऊ शकते. बिघाडा होऊ नये, यासाठी बैठका सुरु असतील. म्हणून हे सरकार जेवढं मजबूत करता येईल, तेवढं मजबूत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) करतील.

राज्यातील राजकीय हालचालींवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले,
सध्या राज्यात खातेवाटप किंवा नवीन मंत्रिमंडळ विस्ताराची
(Maharashtra Cabinet Expansion) चर्चा सुरु असेल.
आता अशी माहिती कानावर येत आहे की,
राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलेला गटही सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उद्या काँग्रेसमध्येही काहीही होऊ शकतं. त्यांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न सुरु असतील असं मला वाटतं. त्यानंतर व्यूहरचना कशी करायची यासाठी नेते दिल्लीत गेले असावेत असे बच्चू कडू म्हणाले.

 

Web Title : Maharashtra Politics News | bachchu-kadu-statement-on-triple-engine-government-can-collapsed-ajit-pawar-visit to delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा