Pune Police MCOCA Action | खडकी परिसरातील किशोर गायकवाड व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 65 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | मदतीच्या बहाण्याने बोलवून लुटणाऱ्या किशोर उत्तम गायकवाड (Kishore Uttama Gaikwad) व त्याच्या 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 65 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये (Pune Police MCOCA Action) कारवाई केली आहे.

फिर्यादी हे खडकी येथील सह्याद्री हॉस्पिटल समोर मोबाईलवर बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी किशोर गायकवाड व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना, आमचा मित्र आजारी असून तो चालू शकत नाही, त्याला उठवण्यासाठी मदत करा, असे म्हणून फिर्यादी यांना मदत करण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना पाठीमागून पकडून त्यांच्या खिशातील मोबाइल जबरदस्तीने घेऊन त्यांना ढकलून देऊन पळून गेले. हा प्रकार 2 सप्टेंबर रोजी घडला होता. याप्रकरणी खकडी पोलीस ठाण्यात (Khakadi Police Station) आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख किशोर उत्तम गायकवाड (वय-19 रा. कमलाबाई बहिरट चाळ, बोपोडी), आशिष उर्फ बोना संतोष सोजवळ Ashish alias Bona Santosh Sojwal (वय-24 रा. सावंत नगरी जवळ, बोपोडी), जॉर्ज डॉमनिक डिसुजा George Dominic D’Souza (वय-19 रा. पवळे चाळ, बोपोडी) यांना अटक केली आहे. तर अजय सुरेश गाडेकर Ajay Suresh Gadekar (वय-20 रा. बोपोडी) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Records) असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट चारने तपास करुन आरोपींकडून 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

टोळी प्रमुख किशोर गायकवाड याने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. आरोपींनी संघटीत किंवा एकट्याने हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाकदपटशा दाखवून, जुलूम जबरदस्ती करुन, अवैध मार्गाने बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला. त्यांच्यावर खुन, दुखापत करणे, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी मागणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Senior PI Rajendra Sahane) यांनी परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा (Pune Police MCOCA Action) अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Ritesh Kumar),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (Mansingh Patil),
पोलीस उप निरीक्षक मालोजी कांबळे (PSI Maloji Kamble), संजय भांडवलकर सर्वेलन्स अंमलदार राजकिरण पवार,
रमेश जाधव, महिला पोलीस अंमलदार किरण मिरकुटे यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध
व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 65 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या
ऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी.
पर्यायी रस्ता तयार होणार !