Pune Police MCOCA Action | वडगाव शेरी परिसरात दहशत माजवणाऱ्या राहुल सिंग व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 75 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरणाऱ्या राहुल सिंग व त्याच्या टोळीतील इतर दोन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 75 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

मित्रासोबत रात्री पायी चालत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्या एकाने जबरदस्तीने मोबाईल हिसका मारून चोरुन नेला. ही घटना 15 सप्टेंबर रोजी वडगाव शेरी येथील सैनिकवाडी येथे घडली होती. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्य़ादीवरुन तिघांवर आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने टोळी प्रमुख राहुल मुकेश सिंग (वय-19 रा. सणसवाडी, मुळ रा. एकमा गाव, पलपुरागाव, छपरा, जि. पाटणा, बिहार), प्रसाद संतोष भोंडवे (वय-18 रा. खराडी रोड, चंदननगर, पुणे), राज राहुल नगराळे (वय-19 रा. गलांडेनगर, जुना मुंढवा रोड, मूळ रा. जामनकर नगर, यवतमाळ) यांना अटक केली आहे.

आरोपी राहुल सिंग याचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता त्याने साथीदारांसह संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली. या टोळीने मागील दहा वर्षात जबरी चोरी, घातक हत्यारांनी दुखापत करणे, चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. या टोळीवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्ररकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999
चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे
यांनी परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या
मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, परिमंडळ- 4 पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे,
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे,
पोलीस निरीक्षक गुन्हे मनिषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने,
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश नवले, रामचंद्र गुरव,
नाना पतुरे, गणेश आव्हाळे, अनुप सांगळे, पुजा डहाळे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti Encroachment Drive | शिवाजीनगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाईचा पुन्हा दणका,
पुणे महापालिकेची 13 हॉटेल्सवर कारवाई