Pune Police Mcoca Action | मुंढवा परिसरात दहशत पसरवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Mcoca Action | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला पिस्टलच्या उलट्या बाजूने डोक्यात मारुन त्याच्यावर पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या सुमित उर्फ लखन गौड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 112 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई (Pune Police Mcoca Action) केली आहे.

टोळी प्रमुख सुमित उर्फ लखन रविंद्र गौड (वय- 32 रा. वडगाव शेरी, पुणे), सिद्धार्थ देवीदास शावळकर (वय-21 रा. केशवनगर), राहूल सोमनाथ धावरे (वय-23 रा. वडगाव शेरी, पुणे) यांच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शावळकर व धावरे यांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी लखन गौड हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना केशवनगर येथे 5 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडेसात वाजता घडली आहे. याबाबत केशवनगर येथील 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

फिर्यादी हे केशवनगर येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या तोंडओखळीचा मुलगा प्रविण सिंग याला आरोपी मारहाण करत होते. फिर्यादी त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेले असता राहुल धावरे याने गळा दाबून ढकलून दिले. तर सुमित गौड याने त्याच्या कंमरेला लावलेली पिस्टल काढून उलट्या बाजूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केल. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुमित गौड याने फिर्यादी यांच्यावर पिस्टल रोखून जीवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत माजवली.

आरोपी सुमित उर्फ लखन गौड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विमानतळ, चंदनगर, मुंढवा पोलीस ठाण्यात
गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन खूनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, दुखापत,
बदल्याची भावना, गैरकायद्याची मंडळी जमवणे, नुकसान करुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केले आहेत.
आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत.

मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्याकडे
सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास
मान्यता दिली. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (सह पोलीस आयुक्त अतिरिक्त कार्यभार)
रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा,
सहायक पोलीस आयुक्त अश्वीनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,
पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिता रोकडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव गायकवाड,
सहायक पोलीस फौजदार अभय काळे, पोलीस अंमलदार हेमंत झुरुंगे, ऋषिकेश टिळेकर, रविंद्र देवढे,
वैभव मोरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

नायजेरियनाकडून अमली पदार्थ आणुन विकणार्‍या दोघांना अटक

Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळवर गोळीबार करणार्‍यांनी दिल्या गुंडाच्या नावाने घोषणा; मामाच्या वादाचा बदल्याबाबत पोलिसांना संशय

Creative Foundation Pune | साधनांची कमतरता नाही गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील