Maharashtra Police News | पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केलीय; मग पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हासाठी अर्ज केलात का

मुंबई : Maharashtra Police News | महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसनीय/गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८०० सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दरवर्षी १ मे रोजी प्रदान करण्यात येतात. राज्य पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून १० प्रवर्गामध्ये शिफारसी मागविण्यात आल्या आहेत. ३१ जानेवारीपर्यंत देण्याची सूचना करण्यात आली आहे. (Maharashtra Police News )

या एकूण ८०० सन्मानचिन्हांपैकी २० टक्के म्हणजे १६०सन्मानचिन्हे चकमकीमध्ये जखमी झालेल्या, अतिरेक्याविरुद्ध व नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमध्ये सामील झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येतील.

Maharashtra Police News

शिफारसीसाठी खालील प्रमाणे प्रवर्ग निश्चित करण्यात आले आहे.

१) ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची लागोपाठ तीन वेळा राज्य शासनाने शिफारस केल्यानंतरही राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान (President’s Police Medal Awarded) करण्यात आलेले नसेल, अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांना़ तसेच ज्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळण्यापूर्वी राष्ट्रपती पोलीस पदक/पोलीस पदक मिळाले असेल, त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येईल.

२) दरोडेखोर/गुन्हेगारांच्या टोळ्या किंवा अघोर व तंत्रबद्ध गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांच्या विरुद्ध केलेली कारवाई

३) सर्व प्रकारच्या सनसनाटी व कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावून तपास करणे (मागील २ वर्षांच्या आतील कामगिरी असणे आवश्यक आहे)

४) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य करणे

५) जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उजळ करणे

६) राष्ट्रीय स्तरावरील खेळांत प्राविण्य दाखविणे

७) पोलिसांच्या कामात सुधारणा घडविण्याकरीता कार्यवाहीत आणता येतील अशा सूचना करणे

८) १५ वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल म्हणजेच अ) कमीतकमी १०० बक्षीसे मिळालेली असावीत ब) मागील १० वर्षाच्या (सन २०१३-१४ ते २०२२ -२३ गोपनीय अहवाल, सेवा पटात कमीतकमी ५ शेरे अतिउत्कृष्ट किंवा उत्कृष्ट मिळविलेले असावेत़ क) सन २०१३ -१४ ते २०२२ -२३ या कालावधीततील प्रतवारी मागील १० वर्षांमध्ये एकही शेरा ब नसावा.

ड) कोणत्याही प्रकारची मोठी शिक्षा नसावी व बेशिस्तीच्या वर्तनाची नोंद नसावी

ई) कोणत्याही प्रकारची चौकशी /विभागीय चौकशी/ कोर्ट केस प्रलंबित /प्रस्तावित नसावी

९ ) पोलीस मोटार परिवहन विभागातील चालक वर्गाने अपघात न करता २० वर्षांचा अभिलेख उत्तम ठेवल्याबद्दल

१०) विशेष शाखेत (प्रशिक्षण संस्था धरुन) ५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल.

११) प्रशंसनीय स्वरुपाचे अन्य दृश्य व अत्युत्तम काम केल्याबद्दल.

Pune BJP Office | जय श्रीरामच्या जयघोषात शहर भाजपचे नवीन कार्यालय सुरू

Pune Marathi News | कट्ट्याने सर्वसामान्यांना स्वतःचे मत निर्धास्तपणे मांडण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र भेट

पार्ट टाईम टास्कच्या मोहात महिलेने गमावले साडेचार लाख

जीवनसाथीवरील ओळखीतून लग्नाच्या आमिषाने शारीरीक संबंध; लग्नास नकार देणार्‍या तरुणावर गुन्हा दाखल

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या जुनेद शेख टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी MCOCA कारवाई