Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ‘मोक्का’ची ‘सेन्चुरी’ (नॉट आऊट), आतापर्यंत 649 आरोपींवर MCOCA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदाभार स्विकारल्यानंतर आतापर्यंत तब्बल 100 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. सन 2023 या चालु वर्षात 100 कारवाया करण्यात आल्या असून तब्बल 649 आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्काचा प्रभावी वापर केल्यामुळे शहरातील अनेक संघटित गुन्हेगारी टोळयांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे सुतोवाच पोलिस आयुक्तांनी यापुर्वी वेळावेळी केले आहे. (Pune Police MCOCA Action)

दि. 8 नाव्हेंबर 2023 रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुसळकर किराणा मालाच्या दुकानाच्या गल्लीतुन एकजण जात असताना आरोपी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर आणि पंकेज दिवेकर यांनी आपआपसात संगणमत करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपी तेजस शंकर जगताप (20, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), अनिकेत सुधीर काटकर (22) यांना अटक करण्यात आली असून ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. आरोपी सौरभ शरद शिंदे (22), चंदर उन्नप्पा/हुन्नप्पा राठोड (22), पंकज संजय दिवेकर (19) हे आरोपी पोलिसांना पाहिजे आहेत. त्यांचा शोध युध्दपातळीवर सुरू आहे. (Pune Police MCOCA Action)

टोळी प्रमुख आरोपी सौरभ शिंदेने इतर सदस्यांना बरोबर घेवून परिसरात टोळीची दहशत निर्माण करून अवैध
मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी सुरू केल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आरोपींवर वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सविता ढमढेरे (Sr PI Savita Dhamdhere) यांनी
पोलिस उपायुक्त आर. राजा (DCP R Raja) यांच्या मार्फत आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव
अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर केला होता.

प्रकरणाची छाननी केल्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) करीत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे
(IPS Ramnath Pokale), वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सविता ढमढेरे, पोलिस उपनिरीक्षक बाळु शिरसट,
पोलिस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे आणि कृष्णा फुले यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 100 संघटित गुन्हेगारी टोळयांमधील तब्बल 649 आरोपींवर
मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार
असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On Police Inspector | पोलीस निरीक्षक मुरलीधर करपेसह तिघांवर गुन्हा दाखल ! वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लाच मागण्याचे प्रोबेशनरी PSI ला प्रशिक्षण?, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागितले 10 ग्रॅम सोन्याचे कॉईन आणि 65 हजार रुपयांची लाच

Lokayukta Bill In Maharashtra | मुख्यमंत्री, मंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत; विधान परिषदेत विधेयक मंजुर, लोकायुक्त निवड समितीही पारदर्शक