Pune Police MCOCA Action | पुण्यातील अट्टल गुन्हेगार बाबुलाल मोहोळ व त्याच्या 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 73 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | दोन ज्येष्ठ महिलांचे अपहरण करुन 17 लाख रुपये खंडणी मागणाऱ्या तसेच उत्तमनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या बाबुलाल मोहोळ व त्याच्या 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत (Mokka Action) कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 73 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये (Pune Police MCOCA Action) कारवाई केली आहे.

आरोपी बाबुलाल मोहोळ याने फिर्यादी यांची आई व त्यांची सहकारी यांना उत्तमनगर परिसरातील एका हॉटेल जवळ भेटण्यासाठी बोलावले होते. फिर्यादी यांची आई गेल्या असता मोहोळ व त्याच्या साथीदारांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील स्टॉल मिळवून देण्याचे काम तु केले नाहीस, तरी तु आमच्याकडून सहा लाख रुपये घेतले. तु आम्हाला स्टॉल दिला नाही म्हणून आमचा तोटा झाला, असे म्हणून फिर्यादी यांच्या आईला मारहाण (Beating) केली. तसेच 6 लाखांच्या बदल्यात 17 लाख रुपयांची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. आरोपींनी फिर्यादी यांची आई व त्यांच्या सहकारी यांना जबरदस्तीने गाडीत बसवून बाबुलाल मोहोळ याच्या घरी नेले. त्याठिकाणी एका खोलीत त्यांना डांबून ठेवले. हा प्रकार 13 सप्टेंबर 2023 रोजी घडला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) आयपीसी 385, 387, 364(अ), 341, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी बाबूलाल लक्ष्मण मोहोळ Babulal Laxman Mohol (वय- 45, सरडे बाग, उत्तमनगर), अमर नंदकुमार मोहिते Amar Nand Kumar Mohite (वय-39, गणेश नगर, एरंडवणे), प्रदीप प्रभाकर नलावडे Pradeep Prabhakar Nalavde (वय -38, रा. भूगाव) आणि अक्षय मारूती फड Akshay Maruti Phad (वय-24, रा. वारजे माळवाडी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपी बाबुलाल मोहोळ याचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्याने अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्यासाठी, तसेच कोथरुड, अलंकार, उत्तमनगर या भागत गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची टोळी तयार केली. त्याच्यावर पुणे शहर तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे, शस्त्रबंदीचे उल्लंघन करणे, खंडणी गोळा करणे अशा प्रकारचे 10 गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3
(1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Sr. PI Kiran Balwadkar)
यांनी परिमंडळ- 3 पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त
पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील (IPS Praveen Kumar Patil) यांच्याकडे सादर केला.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे (ACP Bhimrao Tele) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ- 3 पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा,
कोथरुड विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) याच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख (PI Shabnam Shaikh),
सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), उमेश रोकडे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार पवार, गायकवाड, खाडे, तपास पथकाचे पोलीस अंमलदार नांगरे, पाडाळे, तोडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर