Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 89 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे करुन हडपसर (Hadapsar Police) परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ओंकार मंगेश उभे (वय-22 रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 89 सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धेची कारवाई केली आहे.

आरोपीने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, पालघन, हॉकी स्टिक या सारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार, दरोडा, गंभीर दुखापत,घरा विषयी आगळीक, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यविरुद्ध 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी ओंकार उभे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ओंकार उभे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके व गुन्हे शाखा, पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | रोडवर गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांचा सज्जड दम

Pune Pimpri Chinchwad Crime News | रक्षकच बनला भक्षक, पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल