Pune Police News | मुंढवा बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे 70 वर्षीय वयोवृद्ध महिला सुखरुप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | मुंढवा पोलीस ठाण्यातील (Mundhwa Police Station) बिट मार्शलच्या (Beat Marshall) सतर्कतेमुळे रस्ता चुकलेली एक 70 वर्षीय वयोवृद्ध महिला (Elderly Women) सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. तिच्या कुटुंबीयांनी मुंढवा पोलिसांचे (Pune Police News) आभार मानले आहेत.

मुंढवा पोलीस ठाण्यातील बिट मार्शल (Pune Police News) पोलीस अंमलदार देवानंद खाडे (Devanand Khade) व संदीप गर्जे (Sandeep Garje) हे सोमवारी (दि.24) पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी एक 70 वर्षीय वयोवृद्ध महिला मुंढवा चौकात घाबरलेल्या अवस्थेत फिरताना दिसली. देवानंद खाडे यांनी आजीची चौकशी करुन मदत पाहिजे अशी विचारणा केली. त्यावेळी अजीने काहीही न बोलता फक्त पोलिसांकडे पाहत राहिली तसेच तिचे डोळे पाणावलेले दिसले. आजी वाट चुकली असल्याचे लक्षात येताच खाडे यांनी तिच्याकडे चौकशी केली. महिलेने तिचे नाव बेबी आणि राहणार कसबा पेठ (Kasba Peth) एवढेच सांगितले. तिच्याकडे ओळख पटवण्याकरिता काहीच नव्हते. अखेर देवानंद खाडे आणि संदीप गर्जे यांनी या महिलेला मुंढवा पोलीस चौकीत घेऊन आले.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Senior PI Vishnu Tamhane) समजताच त्यांनी तातडीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) संपर्क साधून महिलेचा फोटो पाठवला.
तसेच महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास कळवण्यास सांगितले.
त्यावेळी फरासखाना पोलिसांनी या महिलेचा शोध तिचे कुटुंबीय घेत असल्याची माहिती दिली.
मुंढवा पोलिसांनी आजीच्या नातेवाईकांशी फोनवर संपर्क साधून त्यांना मुंढवा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

आजीचे जावई हे मुंढवा पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी खात्री करुन आजीला त्यांच्या ताब्यात सुरखरुप दिले.
या महिलेचे नाव बेबी मरीयम अन्सारी Baby Maryam Ansari (वय-70 रा. कसबा पेठ, पुणे) असे आहे.
आजी सुखरुप मिळाल्याने जावई यांनी मुंढवा पोलीस आणि बिट मार्शल यांचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार देवानंद खाडे, रमेश उगले, संदीप गर्जे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे पोस्टर आऊट; स्त्री वेशभूषा पाहून नेटकरी हैरान, रिलीज डेट आली समोर

Railway Introduces ‘Restaurant on Wheels’ to Enhance Passenger Experience at Pune Station