Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेंजहिल परिसरात घरफोडी करुन पळून गेलेल्या तीन चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना गुन्हा घडल्यानंतर 24 तासात अटक केली आहे. हा प्रकार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 12 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोशन अरविंद सोनावले (वय-26), संदिप हरी इंगळे (वय-36), अनिल संजय बुद्देवार (वय-28 तिघे रा. चिंबळी गाव, चाकण), दत्तात्रय भीमराव पवार (वय-43 रा. कपील गोलेश्वर पंचायत टाकी जवळ, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खडकी परिसरातील रेंजहिल (khadki range hills) येथील अय्यप्पा मंदिरासमोरील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Pune Police News)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना मिळालेल्या माहितीनुसार, घरफोड करणारे आरोपी चोरी केलेला
मुद्देमाल कराड येथे विक्रीसाठी घेवून गेले आहेत. त्यानुसार खडकी पोलिसांच्या तपास पथकाने कराड येथे जाऊन
आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींनी चोरीची कबुली देऊन दागिने दत्तात्रय पवार याच्याकडे
असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पवार याचा शोध घेऊन मुद्देमाल ताब्यात घतेला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व रिक्षा आणि एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सोनावले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, मुंबई येथील पोलीस ठाण्यात घरफोडीचे 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे,
पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ, तानाजी कांबळे, पोलीस हवालदार उद्धव कलंदर, अंमलदार संदेश निकाळजे, अतुल इंगळे,
प्रताप केदारी, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत