Pune Police News | पुणे पोलिसांनी (Zone-II) 33 लाख 45 हजारांचे 237 मोबाईल मुळ मालकांना केले परत (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांच्या कल्पनेतून परिमंडळ दोन मधील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत प्रॉपर्टी मिसिंग केसेस (Property Missing Case) विशेषत: मोबाईल फोन (Mobile Theft) बाबत विशेष मोहिम राबण्यात आली होती. यामध्ये परिमंडळ दोन मधील सहा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने तब्बल 33 लाख 45 हजार 624 रुपयांचे 237 मोबाईल मिळवले. मिळवलेले मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत. (Pune Police News)

हरवलेले व चोरलेले मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ दोन मधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ‘एक महिन्याची विशेष’ मोहिम राबवण्यात आली होती. यासाठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr PI) यांच्या अधिपत्याखाली तपास पथकातील अधिकारी व दोन अमंलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकने जे मोबाईल फोन मिळून येत नाहीत, अशा मोबाईल फोनच्या आय.एम.ई.आय क्रमांकावरुन संबंधित मोबाईल कंपनीला पत्रव्यवहार केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे नोव्हेंबर 2023 मध्ये 237 मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pune Police News)

मिळवलेले सर्व मोबाईल फोन हे फिर्यादी यांना परत करण्यासाठी हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच वेळी फिर्यादी यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्याशी संपर्क करुन नागरिकांचे मोबाईल फोन नागरिकांना परत केले जाणार आहेत.

ही मोहिम राबवण्याचे आयोजन पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या कल्पनेतून परिमंडळ दोनच्या हद्दीतील सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग व सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर ACP Narayan Shirgaonkar (स्वारगेट विभाग) व सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी बजावली आहे.

जप्त केलेले मोबाईल

  1. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station) – 60 मोबाईल (7 लाख 76 हजार)
  2. सहकारनगर पोलीस स्टेशन (Sahakar Nagar Police Station) – 33 मोबाईल (5 लाख 13 हजार)
  3. स्वारगेट पोलीस स्टेशन (Swargate Police Station) – 43 मोबाईल (5लाख 45 हजार 500 रुपये)
  4. लष्कर पोलीस स्टेशन (Lashkar Police Station) – 46 मोबाईल व 1 लॅपटॉप (6 लाख 14 हजार)
  5. बंडगार्डन पोलीस स्टेशन (Bundagarden Police Station) – 28 मोबाईल (3 लाख 67 हजार 179)
  6. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन (Koregaon Park Police Station) – 29 मोबाईल (5 लाख 28 हजार 945)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”