Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

अतिरिक्त आयुक्तांनी कनिष्ठ अभियंत्याला सस्पेंड करण्याचे दिले आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | अवघ्या काही आठवड्यांपुर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खाजगी संस्थेला केबल टाकण्यासाठी खोदाई करू देणार्‍या पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबीत (Junior Engineer suspended) करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Development Dhakane) यांनी दिले आहेत. विशेष असे की ढाकणे यांनी आज रस्त्यांची पाहाणी करण्यासाठी त्या परिसरात गेले असताना ही बाब लक्षात आली. त्यांनी संबधित अभियंत्याला विचारणा केली असता त्याने पाण्याच्या पाईपलाईनसाठी अत्यावश्यक बाब म्हणून खोदाई करण्यात आल्याची माहिती दिल्याची खोटी माहिती दिल्याने ढाकणे यांनी त्याला तडकाफडकी निलंबीत करण्याचे आदेश दिले. (Pune PMC News)

यासंदर्भात माहिती देताना ढाकणे यांनी सांगितले, की आज सकाळी ते पाषाणकडे निघाले होते. त्यावेळी अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणार्‍या रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अवघ्या काही आठवड्यांपुर्वीच पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. तोच रस्ता पुन्हा खोदल्याचे पाहून त्यांनी संबधित अभियंत्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने पाईपलाईनच्या खोदाईसाठी अत्यावश्यक बाब म्हणून खोदाई करण्यात आल्याचे ढाकणे यांना सांगितले. परंतू या रस्त्यावरील पाईपलाईनच्या कामासाठी मी स्वत: पाणी पुरवठा विभागाकडे (Water Supply Department) तगादा लावून वेळेत काम करून घेतले आणि रस्त्याचे डांबरीकरणही केले आहे, मग आता कोणत्या पाईपलाईनचे काम काढले? असा प्रश्‍न विचारला. तसेच खोदाईची परवानगी मागितली. पितळ उघडे पडल्याने तो खजिल झाला. कार्यालयात परतताच संबधित अभियंत्याला निलंबीत करण्याचे आदेश काढण्याची सूचना अधिकार्‍यांना केली.

दरम्यान, कात्रज- कोंढवा रस्त्याचे (Katraj- Kondhwa Road) काही ठिकाणी पर्यायी रस्ता करण्याचे काम सुरू आहे.
मागील दोन दिवसांपासून नागरिकांनी हे काम अडविले थांबले आहे.
परंतू दोन दिवसांपासून हे काम थांबले असल्याबाबत वरिष्ठांना कळविले नसल्याने येथील कनिष्ठ अभियंत्यालाही
नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ढाकणे यांनी दिली. (Pune PMC News)

ढाकणे पुढे म्हणाले, की शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, पदपथ दुरूस्त व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात असताना
पथ विभागातील काही अधिकारी कामात कुचराई करत आहेत. परस्पर रस्ते खोदाईला तोंडी मान्यता देत आहेत.
काहीजण पदपथावरील अडथळे, राडारोडा उचलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
अशा सात अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut | महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेसला राऊत यांचे प्रत्युत्तर, ‘आमचा पक्ष फुटला, हे…’

Mahavikas Aghadi | मोठी बातमी! महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा, ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

Nashik Crime News | कोयत्याने वार करुन पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक, रोकड जप्त

Mahavikas Aghadi | मोठी बातमी! महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा, ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली

नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला सहकारनगर पोलिसांकडून अटक

Nashik Crime News | कोयत्याने वार करुन पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक, रोकड जप्त