Pune Police Operation Parivartan | पुणे पोलिसांच्या ऑपरेशन परिवर्तनमधून शेकडो बालकांचं समुपदेशन ! भारती विद्यापीठ पोलिसांच्या पुढाकारांनं ‘त्यांना’ मिळाल्या नोकरी अन् निःशुल्क शिक्षणाचा मार्ग (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Operation Parivartan | अल्पवयीन मुलांना गुन्हयांपासून परावृत्त करण्यासाठी त्याचे समुपदेशन तसेच अल्पवयीन गुन्हेगारांचे सामाजिक व शैक्षणिक पुनवर्सन करण्यासाठी पुणे पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन ही गेल्या काही महिन्यांपुर्वीपासुन सुरू केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या सुचनेनुसार ऑपरेशन परिवर्तन राबविले जात आहे. पुणे शहर पोलिस दलातील झोन-2 मध्ये ऑपरेशन परिवर्तन यशस्वीरित्या राबविण्यात आले असून आतापर्यंत तब्बल 233 अधिक अल्पवयीन बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांची राबविलेल्या ऑपरेशन परिवर्तनला उत्तम प्रतिसाद मिळाला असून समुपदेशन करण्यात आलेल्यांकडून पुन्हा एकही गुन्हा घडलेला नाही. (Pune Police Operation Parivartan)

 

https://fb.watch/lPK1NAjhuM/?mibextid=Nif5oz

 

ऑपरेशन परिवर्तनचा एक भाग म्हणून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याने शनिवारी सायंकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान कात्रज परिसरातील दत्तनगर (Datta Nagar, Katraj) येथील आनंद दरबार (Anand Darbar) येथे मल्टी जिनिअस प्रोफेशल प्रा.लि. (Multi Genius Professional Pvt. Ltd.) पुणे तसेच एस.एम. इंटरप्रायझेस कंपनी (SM Enterprises Company Datta Nagar Pune) आणि कश्मिरचे रहिवाशी व समुपदेशक जाहीद भट (Zahid Bhat), अ‍ॅड. रूपाली थोपटे (Adv Rupali Thopte), समाजसेवक व व्यावसायिक विक्रांत सिंग (Vikrant Singh) यांच्या संयुक्त विद्यामाने विधी संघर्षग्रस्त बालके व त्यांच्या पालकांची आणि मोठया गुन्हेगारांकडून गुन्हेगारी क्षेत्रात येणार्‍या मुलांची, गुन्हेगारांची रिल्सला फॉलो करणार्‍या मुलांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये एकुण 150 हुन अधिकांनी सहभाग नोंदविला आहे. (Pune Police Operation Parivartan)

कार्यशाळेत सहभागी झालेल्या अन् 18 वर्ष पुर्ण झालेल्या 3 युवकांना जागेवरच रोजगार (नोकरी) उपलब्ध करून देण्यात आला आहे. वरील संस्थेच्या माध्यमातुन इतरांना कौशल्यपुर्ण प्रशिक्षण, संगणक तंत्रज्ञान तसेच अर्धवट शिक्षण सुटलेल्या मुलांना पुढील शिक्षणाकरिता निःशुल्क प्रवेश प्रक्रिया सदर जागेवरच राबविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण हे निःशुल्क मिळणार आहे. ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून झोन-2 मध्ये यापुर्वी दि. 5 एप्रिल 2023 , दि. 9 मे 2023 रोजी अल्पवयीन बालकांची कार्यशाळा घेवुन 83 समुपदेशन करण्यात आले होते.

अलिकडील काळात पुणे शहरात शरीराविरूध्द (Body Offence In Pune) तसेच मालमत्तेविरूध्दच्या गुन्हयांमध्ये (Property Offence In Pune) अल्पवयीन युवकांचा मोठया प्रमाणावर सहभाग आढळून आल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडण्याच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे पोलिसांनी ऑपरेशन परिवर्तन ही मोहिम उघडी असून त्याच माध्यमातून भारती विद्यापीठ पोलिसांनी शनिवारी समुपदेशन कार्याशाळा आयोजित केली होती.

समुपदेशन झालेल्यांकडून एकही गुन्हा पुन्हा घडलेला नाही. सामाजिक व शैक्षणिक पुनवर्सन करून विधीसंघर्षग्रस्तांचे आयुष्य कशाप्रकारे उज्वल होईल यासाठी पोलिस सदैव प्रयत्नशील असतात. ऑपरेशन परिवर्तनमुळे खरोखर शेकडो विधीसंघर्षग्रस्त बालकांचे आयुष्य उज्वल झाले असून त्यांना आगामी काळात त्यांचे अर्धवट सुटलेले शिक्षण हे निःशुल्क पुर्ण करता येणार आहे. काहींना रोजगार मिळालेला आहे तर काहींना स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या विधीसंघर्षग्रस्त
बालकांच्या पालकांनी देखील पुणे पोलिसांना कोटी-कोटी धन्यवाद दिले आहेत.
कार्यशाळेत पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर
(ACP Narayan Shirgaonkar) , भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar) यांच्यासह इतर समुपदेशकांनी बालकांना मार्गदर्शन केले आहे. मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांकडुन आगामी काळात कुठलाही गुन्हा अथवा गैरकृत्य होणार नाही अशी हमी देखील देखील दिली आहे.

सदरील विधीसंघर्षग्रस्त बालकांची कार्यशाळा ही पोलिस आयुक्त रितेश कुमार,
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar),
मल्टी जिनिअर प्रोफेशनल प्रा.लि. या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख (Feroze Shaikh),
दत्तनगर येथील एस.एम. इंटरप्रायझेस कंपनीचे डायरेक्टर प्रशांत तांबोळी (Prashant Tamboli),
समुपदेशक जाहीद भट, अ‍ॅड. रूपाली थोपटे, समाजसेवक व व्यावसायिक विक्रांत सिंग व
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमधील (Bharti Vidyapeeth Police Station)
पोलिस अधिकारी तसेच पोलिस अंमलदार यांनी आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडली आहे.

 

Web Title :Pune Police Operation Parivartan | Counseling of hundreds of children through Pune Police’s Operation Parivartan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | कात्रजमध्ये घरात शिरुन मायलेकींवर कुर्‍हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Today Horoscope | 16 July Rashifal : कर्क, कन्या आणि धनु राशीवाल्यांना पैशांच्या बाबतीत दिवस शुभ,
जाणून घ्या अन्य 12 राशींची स्थिती

Shanaya Kapoor | संजय कपूरची मुलगी करणार सिनेविश्वात पदार्पण; चित्रपटाच्या शूटिंगला होणार सुरुवात

Mahavitran In Rooftop Solar Power Generation | छतावरील सौर ऊर्जानिर्मितीत महावितरणकडून ७५ टक्के उद्दीष्ट पूर्ण