Shanaya Kapoor | संजय कपूरची मुलगी करणार सिनेविश्वात पदार्पण; चित्रपटाच्या शूटिंगला होणार सुरुवात

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अनेक स्टार किड्स (Bollywood Star Kids) सिनेविश्वामध्ये दमदार पदार्पण करत आहेत. प्रेक्षक देखील या स्टार किड्सला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता संजय कपूर (Sanjay Kapoor) व महीप कपूर (Maheep Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) सिनेविश्वामध्ये एंट्री करणार आहे. अभिनेते संजय कपूर यांच्या मुलीला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत. शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही बिग बजेट ‘वृषभ’ (Vrushabh Movie) या पॅन इंडिया चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

शनाया कपूर ही पदार्पणापूर्वीच प्रसिद्ध स्टार किड आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. शनाया तिच्या लाईफ अपडेट व नवनवीन हॉट फोटोशूट (Shanaya Kapoor Hot Photoshoot) इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 1.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. पदार्पणापूर्वीच तिची फॅन फॉलोविंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो. शनाया आता दाक्षिणात्य चित्रपटामधून पदार्पण (Shanaya Kapoor South Debut) करणार आहे. ‘वृषभ’ या चित्रपटामध्ये शनाया कपूर सोबत जहरा एस खान (Zahra S Khan) देखील काम करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये साऊथचे प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल (Actor Mohanlal) हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

शनाया कपूरच्या (Shanaya Kapoor) ‘वृषभ’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नंदकिशोर (Director Nand Kishore)
करणार आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती एवीएस स्टूडियोज (AVS Studio), फर्स्ट स्टेप मूवीज (First Step Movies),
बालाजी टेलीफिल्म्स (Balaji Telefilms) आणि कॉनकेक्ट मीडिया (Concat Media) करणार आहेत.
‘वृषभ’ चित्रपटाचे चित्रिकरण प्रामुख्याने तेलुगू व मल्लाळम या भाषांमध्ये होणार आहे.
तसेच नंतर डबिंग करुन वृषभ चित्रपट तेलुगू, तमिळ , मल्लाळम, कन्नड़ आणि हिंदी अशा सर्व भाषांमध्ये एकसाथ रिलीज
(Vrushabh Movie Release) करण्यात येणार आहे. ‘वृषभ चित्रपट’ हा बिग बजेट असून या महिन्याच्या अखेरीस चित्रपटाच्या
शुटिंगला सुरुवात होणार आहे.

Web Title :  Shanaya Kapoor | shanaya kapoor and zahrah s khan to star opposite roshann meka in mohanlals pan india film vrushabha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | ‘अजित पवारांच्या सोयीनुसार खातेवाटप’, खातेवाटपावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Pune Cyber Crime News | पुण्याच्या येरवड्यातील इझी पे प्रा.लि. कंपनीची 3.5 कोटींची फसवणूक करणार्‍या नोंदणीकृत एजंटास सायबर पोलिसांकडून अटक

ACB Trap News | वृद्ध शेतकऱ्याकडून 2 लाखाची लाच घेताना दैनिकाच्या संपादकासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून मुंढव्यातील ICICI बँकेचे एटीएम फोडुन चोरी करणार्‍यांना 24 तासात अटक