Pune Rains | पहिल्याच पावसात पुणे शहर तुंबले; पालिकेच्या कारभारची पोलखोल, नागरिक संतप्त

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Rains | पुणे शहरात पहिल्या पावसाचे दमदार आगमन झाले. दिवसभर पावसाची उघडझाप चालू होती. मात्र पहिल्याच पावसात पालिकेच्या कामांचे तीन तेरा वाजलेले दिसून आले. पालिकेने शहरात पावसापूर्वी केलेल्या पावसाळी कामांच्या दर्जाची पोलखोल पावसाने अगदी पहिल्याच पावसात केली. पहिल्याच पावसात (Pune Rains) पुणेकर अगदी खड्डातच गेले. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचले होते. नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत होते. यामुळे पालिका (Pune PMC) प्रशासनावर आणि त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिकेकडून पावसाळ्याची तयारी अगदी अनेक महिन्यापासून केली जात आहे. मागील वर्षी शहराची झालेली तुंबलेली अवस्था यामुळे यावर्षी तरी प्रशासन योग्य ती तयारी करेल अशी वायफळ आशा नागरिकांना होत्या. मात्र पहिल्याच पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फिरले. पालिका आयुक्त विक्रमकुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडून पंधरा जून रोजी पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात शहरात खड्डे पडल्याचे चित्र सर्वत्र होते (Pune Rains). अनेक ठिकाणी नालेसफाई नीट न झाल्याने गटारातील पाणी बाहेर वाहत होते. चेंबर तुंबल्यामुळे पाणी एका जागी साचले होते. त्यामध्येच मेट्रोचे काम चालू असल्याने पाणी अडून राहिले होते. यातून रस्ता काढण्यात नागरिकांची तारांबळ उडाली. (Pune News)

पुणे शहरातील जवळजवळ सर्वच भागात हे चित्र पाहायला मिळाले. कर्वे रोड परिसरातील सह्याद्री रुग्णालय ते डेक्कन, प्रभात रस्ता, सिंहगड रस्त्यावरील गणपतीनगर येथील चौक, डेक्कन (Deccan) ते शनिवार पेठ येथील नदीपात्र अशा ठिकाणी चेंबरचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणी साचले होते. डेक्कन बसस्थानक, भांडारकर रस्ता (Bhandarkar Road), महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Mandai), मार्केट यार्ट (Market Yard), शंकर शेठ रस्ता, विधि महाविद्यालय (Law College,Pune) आणि स्वारगेट (Swargate) असे शहरातील सर्वच भागात पाणी साचून नाल्याचे स्वरुप रस्त्याला आले होते. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासानावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Web Title :  Pune Rains | water monsoon works in first rain in pune administration of the municipal corporation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा