Pune Rural News : पुणे-सोलापूर महामार्गावर तब्बल 25 लाखाचा गुटखा जप्त, ग्रामीण पोलिसांच्या LCB ची कारवाई

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर पोलिस स्टेशन परिक्षेत्रात अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 25 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशान्वये रामेश्वर धोंडगे, पोलीस उप निरीक्षक तसेच दत्तात्रय जगताप,सहा.पोलीस उप निरीक्षक, पो.हवालदार मुकुंद आयाचित,राजु बापुराव पुणेकर पोलीस हवालदार सागर चंद्रशेखर, पो.काॅ.बाळासाहेब खडके, असे सोलापुर पुणे महामार्गावर सरकारी वाहनाने गस्त घालत असताना लोणीकाळभोर गावच्या हद्दीत राजेंद्र पेट्रोल पंपाचे समोर पुणे बाजुकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणारे अंबरनाथ फर्निचर नावाच्या दुकानासमोर सुरेश मिलापचंद ओसवाल वय वर्षे 44 रा.चितामणी पार्श्वनाथ बिल्डिंग , महात्मा फुले नगर, माळी मळा लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे तसेच अविनाश भारत जाधव वय वर्षे 25 रा. नायगांव ता.हवेली जि.पुणे या दोघांनी एकत्रीतपणे कोव्हीड या रोगाचे संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त याचे कडील प्रतिबंधित गुटखा, पान मसाला किंवा गुटखा किंवा पानसमला घटीत होवु शकेल असा पदार्थ सुगंधीत किंवा स्वादिष्ठ सुपारी/तंबाखू इत्यादीचे उत्पादन/साठा/वितरण/वाहतुक तसेच विक्री यावर बंदी असताना गुटखा हे मानवी जिवीतास अपायकारक असा प्रतिबंधक पदार्थ आहे, याची जाणीव असताना तसेच शासनाचे मनाई आदेशाचा भंग करून 25,44,172 /- रू.(गुटखा, वाहन ,मोबाईल व रोखरक्कम सह) किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व साधने त्याचे ताब्यातील महेंद्र बोलेरो पिकअप नंबर एम.एच.12/एस.एफ/6933 मध्ये स्वतःचे आर्थीक फायदयाकरिता बेकायदेशीरपणे वाहतुक करीत असल्याचे आढळून आले सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद लोणीकाळभोर पेालीस स्टेशनला दिली आहे.

सुरेश मिलापचंद ओसवाल याचेवर यापुर्वी गुटख्याची विक्री, वाहतूक, साठा केलेबाबतचे एकूण 07 गुन्हे दाखल असून दिनांक 28/1/2021 रोजी अन्न व औषधे प्रशासन यांनी कारवाई केलेली असुन त्याबाबत लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असुन तो या गुन्हयात सुध्दा तो फरारी आहे.

ही कामगिरी LCB चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर धोंडगे,सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, राजु पुणेकर पोलिस हवालदार मुकुंद अयाचित,पोलिस नाईक सागर चंद्रशेखर, पोलिस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके यांनी केली.