Pune Sahakar Nagar Police | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतुस जप्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sahakar Nagar Police | जीवाला भिती असल्याने विनापरवाना पिस्टल (Unlicensed Pistol) बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल (Pistol Seized), एक जिवंत काडतुस असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.29) तळजाई पठार धनकवडी (Taljai Pathar Dhankawadi) येथे करण्यात आली. वैभव उर्फ संयम प्रकाश कटरिया Vaibhav alias Sanyam Prakash Kataria (वय-19 रा. साईली ईन एरीया, चैतन्य नगर, एमआयडीसी बारामती ता. बारामती – Baramati MIDC) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस आंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, एक मुलगा तिरुपती नगर (Tirupati Nagar Dhankawadi) चौक तळजाई पठर धनकवडी येथील रोडवर कोणाची तरी वाट पाहात थांबला आहे. त्याच्या कंबरेला पिस्टल सारखे हत्यार असून तो संशयितरित्या उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून वैभव कटारीया याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीसनह व एक जीवंत काडतुस मिळाले. त्याच्याकडून 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीकडे पिस्टल बाळण्याबाबत विचारले असता त्याने सांगितले, दोन वर्षापूर्वी आरोपीने एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्यापासून जीवाला भीती असल्याने पिस्टल बाळगल्याचे सांगितले. आरोपीवर दोन खुनाच्या प्रयत्नाचे व एक मारामारीचा असे तीन गुन्हे बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) दाखल आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagyani), वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale), पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे (Uttam Bhajnawale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक छबु बेरड (API Chabu Berad), सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड (ASI Bapu Kutwad), पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, अमित पदमाळे, संजय गायकवाड, निलेश शिवतारे, सागर सुतकर, विशाल वाघ यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pandav Nagar Crime | जुन्या वादातून मित्रावर कोयत्याने वार, पांडवनगर परिसरातील घटना